मुंबईतून एका संशयित दहशतवाद्यास अटक; एटीएसची मोठी कारवाई

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने विविध ठिकाणांहून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव झाकीर असल्याची माहिती समोर आली आहे.
A joint team of Maharashtra ATS and Mumbai Police Crime Branch has taken a person into custody from Jogeshwari area of the city in connection with the terror module busted by Delhi Police earlier this week: Maharashtra ATS pic.twitter.com/ZYmIungyPl
— ANI (@ANI) September 18, 2021
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हा मुंबईत राहणारा होता. त्यातच आता महाराष्ट्र एटीएसने मुंबईतून आणखी एका संशयित दहशतवाद्याला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई रात्री उशिरा महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी केली आहे. महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरी परिसरातून या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या झाकीरचे आणि दिल्ली पोलिसांनी अटक केल्या सहा दहशतवाद्यांचे एकमेकांसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसारच महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई पोलिसांनी झाकीरला ताब्यात घेतले आहे.




