कोटकची मुंबई इंडियन्सशी भागीदारी; माय टीम इमेज कार्डचा दुसरा डाव सुरू
एमआय चाहत्यांसाठी विशेष क्रिकेट आवृत्ती डेबिट आणि क्रेडिट कार्ड

मुंबई : कोटक महिंद्रा बँक लिमिटेडने (केएमबीएल) आज अभिमानाने जाहीर केले की ते सलग दुसर्या वर्षी मुंबई इंडियन्सचे भागीदार झाले आहेत. गेल्या वर्षीच्या कोटक माय टिम इमेज कार्डला एमआयच्या चाहत्यांकडून मिळालेल्या उत्साही प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन, केएमबीएल यावर्षी माय टीम कार्डचा दुसरा डाव सादर करीत आहे. खासकरुन एमआय चाहत्यांसाठी तयार केलेली क्रिकेट-थीम असलेली ही डेबिट आणि क्रेडिट कार्डची एक श्रृंखला असेल. कोटक माय टीम इमेज क्रिकेट आवृत्ती डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सच्या श्रेणीमध्ये प्रत्येक एमआय चाहत्यासाठी कार्ड एक परिपूर्ण बक्षीस ज्यावर खेळाडूंची छायाचित्रे, मुंबई इंडियन्सचा लोगो व वॉटरमार्क, आणि एमआय संघाचे अधिकृत टीम रंग असतील. कोटक माय टिम इमेज कार्ड केवळ रु १९९/ – च्या खास किंमतीला उपलब्ध आहे.
पुनीत कपूर, अध्यक्ष – उत्पादने, पर्यायी वाहिन्या आणि ग्राहक अनुभव वितरण, कोटक महिंद्रा बँक लि. म्हणाले, मुंबई इंडियन्सबरोबरची भागीदारी जाहीर करताना आम्हाला आनंद होतो आहे. आधी ऑस्ट्रेलियाशी आणि नंतर इंग्लंडशी झालेल्या अतिशय रंजक मालिका झाल्यानंतर जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी क्रिकेटच असणारे क्रिकेटप्रेमी आता आणखी मजेसाठी तयार आहेत. कोटक चाहत्यांसाठी आनंददायक भेटीसह सज्ज आहेत. आपल्या संघासाठी जयघोष करताना एमआय चाहते कोटक माय टिम कार्डच्या रूपात त्यांच्या आवडत्या संघाची खिशात मावेल अशा आकाराची प्रतिकृती घेऊ शकतात.
मुंबई इंडियन्सचे प्रवक्ता म्हणाले, आमच्या मैदानावरील कामगिरीद्वारे आणि मैदानाबाहेरील मूल्यवर्धित कार्यक्रमांद्वारे आम्ही आमच्या चाहत्यांना मिळणारा अनुभव अधिकाधिक समृद्ध करण्याचा सातत्याने प्रत्येक क्रिकेटप्रेमीसाठी कोटक माय टिम कार्ड प्रयत्न करत असतो. कोटक महिंद्र बँकेशी सलग दुसर्या वर्षी केलेली ही भागीदारी ही आमच्या चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणीच आहे.
विद्यमान आणि नवीन केएमबीएल ग्राहक त्यांच्या पसंतीच्या कोटक माय टीम इमेज डेबिट आणि / किंवा क्रेडिट कार्डसाठी www.kotak.com वेबसाइटवर किंवा नेट बँकिंग किंवा मोबाइल बँकिंगमध्ये लॉग इन करून अर्ज करू शकतात.