केअरएक्स्पर्टद्वारे महाराष्ट्रातील हॉस्पिटल्सचे डिजिटायझेशन
मुंबई : भारतभरातील हॉस्पिटल्सना त्यांच्या कार्यसंचालनांचे डिजिटायझेशन करण्यासोबत रूग्ण-केंद्रित सेवा देण्यामध्ये सक्षम करण्याप्रती आपल्या कटिबद्धतेशी बांधील राहत जिओचे पाठबळ असलेल्या केअरएक्स्पर्ट या आघाडीच्या सास-आधारित (SaaS-based), एआय-सक्षम डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म प्रदात्याने जाहिर केले आहे की, महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, ठाणे व नागपूर या चार शहरांमधील २० हून अधिक हॉस्पिटल्स व आरोग्यसेवा केंद्रे (ईओएन, आयमॅक्स, किंग्जवे, अॅल्बोट हेल्थ, रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल, इत्यादी) आता त्यांच्या क्रांतिकारी सेवांचा उपयोग करत आहेत.
आपले मत व्यक्त करत केअरएक्स्पर्टच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधी जैन म्हणाल्या, एकीकृत आरोग्यसेवा उपाययोजनांच्या अभावामुळे सध्या महाराष्ट्रातील आरोग्यसेवा पायाभूत सुविधेला खंडित कार्यप्रवाह, कार्यसंचालनामध्ये अकार्यक्षमता व कागदोपत्री वैद्यकीय नोंदी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. केअरएक्स्पर्टमध्ये आम्ही ग्राहकांना ५० हून अधिक प्री-इंटीग्रेटेड मॉड्यूल्स देत आमच्या एकमेव व्यासपीठ-आधारित दृष्टिकोनासह या आव्हानांचे निराकरण करतो. वापरण्यास सुलभ सेवांसह आमच्या सोल्यूशनला अधिक किफायतशीर करत आम्ही महाराष्ट्राच्या द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील लघु व मध्यम आकाराच्या हॉस्पिटल्सना या सेवा देऊ शकतो. आमचे सोल्यूशन उच्च समन्वयित कार्यप्रवाह, कार्यसंचालनांमध्ये उत्तम सहकार्य आणि प्रत्येक पावलावर उच्च रूग्ण सहभाग प्रमाणाची खात्री देते.
मागील दीड वर्षामध्ये कोविड-१९ साथीच्या रोगाने भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील सध्याच्या आरोग्यसेवा यंत्रणेच्या खालावलेल्या स्थितीचे दयनीय चित्र समोर आणले आहे. दीर्घकाळापासून कर्मचा-यांची कमतरता, दर्जात्मक आरोग्यसेवा ऑटोमेशन यंत्रणांचा अभाव आणि अपुरे आरोग्यसेवा व आयटी मनुष्यबळ ही महाराष्ट्राच्या सज्ज नसलेल्या व उपलब्ध न होण्याजोग्या असलेल्या आरोग्यसेवा यंत्रणेसाठी प्रमुख कारणे आहेत. ही समस्या विशेषत: द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील वंचित दाट वस्तीच्या भागांमध्ये व ग्रामीण भागांमध्ये गंभीर आहे. तसेच प्रांतामधील हॉस्पिटल्स व आरोग्यसेवा प्रदात्यांना अनेकदा त्यांच्या अकार्यक्षम व वारसायुक्त आयटी यंत्रणांचे व्यवस्थापन करण्यामध्ये संघर्ष करावा लागतो आणि ऑनलाइन अपॉइण्टमेंट यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डस्, टेलिकन्सल्टेशन व होमकेअर करत रूग्णांची अधिक दर्जात्मक काळजी घेऊ शकत नाहीत. यामुळे आरोग्यसेवा प्रदाते व रूग्णांमधील संबंध कमी होतो आणि उद्योगामध्ये नवीन तंत्रज्ञानांच्या अवलंबेमध्ये अडथळा येतो. म्हणूनच केअरएक्स्पर्टचा ५० हून अधिक प्री-इंटीग्रेटेड मॉड्यूल्ससह व्यवस्थापित सेवा मॉडेल म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांचा आकार व स्थळाकडे न पाहता आधुनिक तंत्रज्ञानांच्या माध्यमातून डिजिटल आरोग्यसेवा आणत आरोग्यसेवा पायाभूत सुविधा सुव्यवस्थित करण्याचा मनसुबा आहे.
केअरएक्स्पर्ट डिजिटल हेल्थकेअर प्लॅटफॉर्म वापरण्यास अत्यंत सुलभ असून अपवादात्मकरित्या सुलभ इंटरफेससह येतो आणि हॉस्पिटल्सची आयटी पायाभूत सुविधा किंवा कर्मचारीवर्गावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची गरज दूर करतो. यामधील क्लाऊड-आधारित सोल्यूशन आता देशाच्या कानाकोप-यामध्ये उपलब्ध होऊ शकते, ज्याचे श्रेय भारताच्या दुर्गम भागांना डिजिटली कनेक्ट करण्यासाठी जिओसोबत केलेल्या सहयोगाला जाते. तसेच कंपनी अहोरात्र कार्य करणारी सपोर्ट टीम आणि जलदपणे सेवा देते. ज्यामुळे कंपनी विश्वसनीय व प्रामाणिक हॉस्पिटल आयटी सहयोगी आहे.