कोलकाताचा पहिल्याच सामन्यात धक्का, हैदराबादवर १० धावांनी विजय

चेन्नई : कोलकाता नाइट राडयर्सने पहिल्याच सामन्यात दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजी करत सनरायझर्स हैदराबादवर १० धावांनी विजय साकारला. नितिष राणाच्या ८० धावाच्या जोरावर कोलकाताने हैदराबापुढे १८८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादला यशस्वीपणे करता आला नाही आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. कोलकाताने हैदराबादला विजयासाठी दिलेले १८८ धावांचे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवले नाही. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो (५५) आणि मनिष पांडे (६१) या दोघांचे प्रयत्न कमी पडले. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
केकेआर विरुद्ध एसआरएच सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. या सामन्यात कोलकात्याचा सलामीवीर नितीश राणाने ५६ चेंडूत ८० धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने (५३) अर्धशतक ठोकत कोलकात्याला मजबूत धावसंख्या उभारून दिली. शेवटच्या षटकात फटकेबाजी करत दिनेश कार्तिकने कोलकात्याला १८० धावांचा टप्पा ओलांडून दिला.
कोलकात्याने हैदराबादला 188 धावांचे आव्हान दिले होते. केकेआरच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत या आव्हानाचा बचाव केला. त्यातही प्रामुख्याने शेवटच्या षटकात आंद्रे रसेलने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे हैदराबादला विजयी आव्हान पूर्ण करता आले नाही. अखेर कोलकात्याने हैदराबादवर १० धावांनी विजय मिळवला. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.
कोलकाताच्या १८८ धावांचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात फक्त एका धावेवर असताना जीवदान मिळाले होते. पण यााचा फायदा वॉर्नरला उठवता आला नाही. कोलकाताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने वॉर्वरला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. वॉर्नरला यावेळी तीन धावांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर सलामीवीर वृद्धिमान साहाही लवकर बाद झाला आणि हैदराबादला दुसरा धक्का बसला.
हैदराबादने आपले दोन्ही सलामीवीर लवकर गमावले. पण त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी संघाला डाव सारवला. जॉनी आणि पांडे या दोघांनी कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. जॉनीने यावेळी षटकारासह आपले अर्धशतक साजरे केले. पण अर्धशतक झळकावल्यावर मात्र जॉनीला जास्त काळ फलंदाजी करता आली नाही. कोलकाताच्या पॅट कमिन्सने यावेळी जॉनीला बाद केले. जॉनीने यावेळी ४० चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटाकारांच्या जोरावर ५५ धावांची खेळी साकारली.
सलामीवीर शुभमन गिलने यावेळी चौकार लगावत कोलकाताला चांगली सुरुवात करून दिली. पण गिलपेक्षा राणा यावेळी जास्त आक्रमक फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. गिलला यावेळी मोठी फटकेबाजी करता आली नाही. हैदराबादच्या रशिद खानने यावेळी गिलला त्रिफळाचीत केले आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. गिलला यावेळी १५ धावांवरच समाधान मानावे लागले. गिल बाद झाल्यावर कोलकाताला धक्का बसला असला तरी राणाने यावेळी धडाकेबाज फलंदाजी करणे सोडले नाही. राणाने यावेळी हैदराबादच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. राणाने यावेळी उत्तुंग षटकार लगावत आपले अर्धशतक पूर्ण केले.
राहुल त्रिपाठीने यावेळी फक्त २८ चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. हे त्रिपाठीचे आयपीएलमधील सहावे अर्धशतक ठरले. पण अर्धशतक झळकावल्यावर त्रिपाठी जास्त काळ फलंदाजी करू शकला नाही, कारण टी. नटराजनच्या गोलंदाजीवर त्याचा सुंदर झेल हैदराबादचा यश्टीरक्षक वृद्धिमान साहाने पकडला. त्रिपाठीने यावेळी २९ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली. राणाने यावेळी ५६ चेंडूंत ९ चौकार आणि चार षटकारांसह ८० धावांची दमदार खेळी साकारली.
हैदराबादकडून मोठ्या चुका
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून यावेळी काही चुका झाल्या आणि त्यांना त्या चांगल्याच महागात पडल्या. कोलकाताच्या संघाने यावेळी १८८ धावांचे आव्हान हैदराबादपुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग हैदराबादचा करता आला असता. पण त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच षटकात फक्त एका धावेवर असताना जीवदान मिळाले होते. पण याचा फायदा वॉर्नरला उठवता आला नाही. कोलकाताचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णनने वॉर्नरला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. वॉर्नरला यावेळी तीन धावांवर समाधान मानावे लागले.
हैदराबादच्या संघाकडून गेल्या आयपीएलमध्ये वृद्धिमान साहाने धडाकेबाज फलंदाजी केली होती. या हंगामातही साहाकडून मोठी अपेक्षा आहे. पण या सामन्यात मात्र साहाला चांगली फलंदाजी करता आली नाही. साहाला यावेळी फक्त सात धावांवर समाधान मानावे लागले आणि हैदराबादचे दोन्ही सलामीवीर फक्त १० धावांमध्येच तंबूत परतले.
जॉनी बेअरस्टो आणि मनीष पांडे यांनी हैदराबादकडून अर्धशतके झळकावली खरी, पण त्यांना संघाला विजय मिळवून देता आला नाही. खासकरून मनीष हा अखेरपर्यंत खेळपट्टीवर होता, त्याचबरोबर अर्धशतक झळकावत तो स्थिरस्थावर झालेला होता. त्यामुळे मनीषकडून संघाला यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या. पण जॉनी बाद झाल्यावर त्याची फलंदाजी थोडी संथ झाली आणि तिथेच हैदराबादच्या हातून सामना निसटला.
हैदराबादचा संघ हा गोलंदाजीसाठी ओळखला जातो. हैदराबादच्या संघाला आतापर्यंत भुवनेश्वर कुमार आणि संदीप शर्मा यांनी चांगली सुरुवात करुन दिलेली होती. पण या सामन्यात मात्र हे दोन्ही गोलंदाज चांगलेच महागडे ठरले. त्याचबरोबर त्यांच्या गोलंदाजीचा चांगला वापर यावेळी वॉर्नरला करता आला नाही. भुवनेश्वरने यावेळी ४ षटकांमध्ये ४५ धावा, तर संदीपने ३ षटकांमध्ये ३५ धावा दिल्या. या गोष्टीचा मोठा फटका हैदराबादच्या संघाला बसला.




