मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शिवडी कोर्टाने १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सोमय्यांविरोधात अर्थ एनजीओने अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला होता. या दाव्यावर शिवडी कोर्टात सुनावणी करण्यात आली किरीट सोमय्यांनी राष्ट्रवादी नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्य करण्यात आले होते. याविरोधात प्रवीण कलमे यांनी सोमय्यांविरोधात दोन वेगळ्या प्रकारचे बदनामीचे खटले दाखल केले होते. या खटल्यावर सुनावणी करण्यात आली. यावेळी किरीट सोमय्यांना कठोर अटींसह १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सोडण्यात आलं आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. सोमय्यांनी एप्रिलमध्ये घोटाळ्याचे आरोप केले होते. जितेंद्र आव्हाड यांनी एसआरए आणि म्हाडामध्ये असलेल्या बिल्डरांकडून १०० कोटी रुपये जमा करण्यास प्रवीण कलमे यांना सांगितले होते असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कलमे आणि अर्थ एनजीओने सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला होता. कलमे सरकारी संस्थांमधील दुसरे सचिन वाझे असल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांनी शिवडी कोर्टात हजेरी लावली होती. शिवडी कोर्टाने सोमय्यांना १५,००० च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आणि दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हा पुन्हा न करण्यासह कठोर अटीं सह जामीन दिला आहे. अटींच उल्लंघन झाल्यास जामीन रद्द केला जाऊ शकतो असे न्यायालयाने म्हटलं आहे.
शिवडी कोर्टाच्या सुनावणीनंतर माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या यांनी ट्विट करत कोर्टात सुनावणीसाठी हजर राहिलो असल्याची माहिती दिली आहे. सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, माझ्याविरोधात ६ अब्रुनुकसानीचा दावे करण्यात आले असून या कारवाईला घाबरत नाहीत. महाविकास आघाडीमधील घोटाळेबाज अनिल देशमुख, आनंद अडसूळ, भावना गवळी, परमबीर सिंह, अनिल परब, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक चौकशीला हजर राहण्यापासून पळत असल्याचे सोमय्या यांनी म्हटलं आहे.