मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करताना नेहमी ‘जान है तो जहान है’, असे बोलतात, त्यामुळे जीव आहे, तर सर्व आहे, चंद्रकांत पाटलांनी हे लक्षात घ्यावे या भाषेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना सुनावले आहे. राज्यातली रुग्णसंख्या कमी झाली की निर्बंध शिथील करता येतील. सध्या रुग्णसंख्येतील वाढ मोठी आहे त्यामुळे निर्बंध घालणे गरजेचे आहे, असेही टोपे म्हणाले आहे. आज आपण संपूर्ण बंद नाही केलं, काही गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय घेऊन बंद केल्याचे टोपे यांनी सांगितलं.
राज्यातल्या निर्बंधावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती, त्याला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्युत्तर देताना मोदींच्या वाक्याची आठवण करून दिली आहे. सततच्या लॉकडाऊनच्या जाचाला कंटाळून पुण्यातल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची बातमी कळली. शिथिल न झालेले निर्बंध आणि नोकरी गमावून बसल्यामुळे तरुणांना आपलं आयुष्य संपवावं लागत आहे. मात्र सरकारने निर्बंधांचा कळस गाठला असून नागरिकांचा गळा घोटणं सुरूच ठेवलं आहे. मी अनेकदा हे सांगितलं होतं की, निर्बंध शिथिल करा, लोकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करा आणि जनजीवन सुरूच ठेवा. मात्र सरकारने जनतेचा काहीही विचार केला नाही आणि अशा कित्येक तरुणांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या सर्व आत्महत्यांसाठी राज्य सरकारच जबाबदार आहे, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली होती.
राजाही वर्क फ्रॉम होम, प्रजाही वर्क फ्रॉम होम, चंद्रकांत पाटलांची टोलेबाजी
राज्यात लावलेल्या निर्बंधावर भाजप नेते सतत टीका करत आहेत, तसेच मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत, यावरूनही चंद्रकांत पाटलांनी पुन्हा मुख्यमंत्र्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी राजाही वर्क फॉम होम आणि प्रजाही वर्क फॉम होम असे म्हणत मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले आहेत. महाविकास आघाडी सरकारामधील नेत्यांचा आपाआपसात पायपोस नाहीये, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. निर्बंधाच्या घोळामुळे एक आत्महत्या नाही तर अनेक आत्महत्या झाल्या, भयानक सुरू आहे सर्व, मुंबई पालिका आयुक्त चहल खरं बोलतायत का उद्धव ठाकरे ? असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला आहे.
रुग्णांची विचारपूस कॉलद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णाला अडचण आल्यास ल्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावं यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, तसेच डॅशबोर्ड तयार करून रुग्णांना सर्व माहिती व्यवस्थित मिळावी याची खबरदारी घेतली जाणार, यात रुग्णांना बेड आणि औषधांबाबत माहिती मिळणार आहे. अशी माहितीही टोपेंनी दिलीय.
कोरोना निर्बंधाबाबत नागरिकांनी सहकार्य करावे : टोपे
होम आयसोलेटेड रुग्णांना हेल्थ किट देणार
टोपे यांनी पत्रकार परिषद घेत केंद्राकडून आलेल्या सूचनांबाबत माहिती देण्यात आली आहे. जास्त रुग्णांना लक्षण नाहीत, लक्षणं असणाऱ्य रुग्णांची संख्या कमी आहे. होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांसाठी होम आयसोलेशन हेल्थ कीट देणार आहेत, त्यात सॅनिटायझर, १० मास्क, माहिती पुस्तिका, १० पॅरासिमॉल टॅबलेट, २० मल्टी व्हिटॅमिनच्या टॅबलेट असणार आहेत, तशा सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. तसेच क्वारंटाईन काळ हा सर्व राज्यात सात दिवसांचाच राहणार आहे. अशी माहिती टोपेंनी दिली आहे.
कॉल सेंटरवरून रुग्णाला कॉल जाणार असल्याचीही माहिती टोपे यांनी दिली आहे. कॉल सेंटरवरून ही प्रक्रिया पार पडणार आहे. रुग्णांची विचारपूस कॉलद्वारे करण्यात येणार आहे. रुग्णाला अडचण आल्यास त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात यावं यासाठी ही प्रकिया सुरू करणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले, तसेच डॅशबोर्ड तयार करून रुग्णांना सर्व माहिती व्यवस्थित मिळावी याची खबरदारी घेतली जाणार, यात रुग्णांना बेड आणि औषधांबाबत माहिती मिळणार आहे.
ऑक्सिजन निर्मितीचे ४०४ प्लांट सुरू
ऑक्सिजन निर्मितीचे ४०४ प्लांट सुरू झाले आहेत, येणाऱ्या आठ ते दहा दिवसात आणखी १०० प्लांट सुरू होणार असल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. बेड व्हेंटिलेटची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. ईसीआरटीटू च्या माध्यामातून केंद्र सरकारकडून काही निधी देण्यात आल्याची माहितीही राजेश टोपे यांनी दिली. तसेच केंद्राने कलेक्टर लेवलला परवानगी देऊन खर्च करण्यात यावा अशी मागणी केल्याचेही सांगितले. आरोग्य विभागाकडून टेंडर काढली आहेत, त्यामुळे लवकरच निधीच्या खर्चाचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. लसीकरणात महाराष्ट्रात आणखी वेग वाढण्याची गरज आहे, असे मत केंद्राकडून नोंदवण्यात आले आहे, त्यामुळे लसीकरण आणखी वेगवान होणार आहे.