आरोग्यराजकारण

महाराष्ट्रासाठी १२ कोटी डोस एकरकमी घेतो, पण लस पुरवा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मोदी सरकारला साकडे

मुंबई : महाराष्ट्रातील ६ कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करुन द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्याची योजना मुख्यमंत्र्यांनी सांगितली. जी मदत जाहीर केली त्याची अंमलबजावणी करत आहोत. संपूर्ण जागात लाटांमधून लाटा येत आहेत. किती लाटा येणार हा प्रश्नच आहे. पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट आली. आता तज्ज्ञ म्हणत आहेत की तिसरी लाटसुद्धा येणार. तिसरी लाट आली तरी त्याचे एवढे घातक परिणाम होऊ द्यायचे नाही, यासाठी सरकारने कंबर कसली आहे. दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. तिसऱ्या लाटेत अर्थचक्र थांबता कामा नये. मी कामगार वर्गाच्या युनियन लिटरशी बोललो आहे. त्यांनी काय करायला पाहिजे याची मी त्यांना कल्पना दिली आहे. मला खात्री आहे. तिसरी लाट थोवण्यात यश येणार याची खात्री आहे.

राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण. देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात आहे. दुर्दैवाने सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात आहेत. १२ कोटी डोस महाराष्ट्राला लागणार आहेत, त्यासाठी एकरकमी चेक देण्याची तयारी महाराष्ट्राने ठेवली आहे. पण लसीचा पुरवठा मर्यादित आहे.

उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु करतोय. १८ म्हटलं तर युवा आलाच, आणि युवा आले तर उत्साह आलाच. कोविन अ‍ॅप काल क्रॅश झालं. थोडं मार्गी लागेपर्यंत असं होणार. मी पंतप्रधानांना विनंती केली आहे, राज्यांना आपआपली अ‍ॅपची परवानगी द्या, ते अ‍ॅप केंद्राशी कनेक्ट करा. असं झालं तर सोय होईल. अ‍ॅपवर नोंदणी करुन, माहिती मिळेल, त्या वेळेप्रमाणे केंद्रावर पोहोचा. महत्वाचं म्हणजे लस मर्यादित आहे. साधारण जून-जुलैपासून पुरवठा वाढेल. तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये. तिथे झुंबड उडतेय हे मी समजू शकतो. ज्या बातम्या येतात त्याने मन विष्ण्ण होतं.

उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरु होतंय, उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करु नका. लसीकरण केंद्रावर गर्दी करु नका, नाहीतर कोरोना प्रसारक केंद्र होईल. काळजी घ्या. आपल्याकडे ३ लाख ४४ हजार लसी आल्या आहेत. त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत. आपली क्षमता दहा लाखांची दिवसा आहे. आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. आपण दिवसरात्र मेहनत करुन महाराष्ट्र कोरोनामुक्त करु.

अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर टाळा

गरज नसताना रेमडेसिव्हीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. अनावश्यक रेमडेसिव्हीरचा वापर करू नये ही माझी विनंती आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉक्टर्स आणि कोविड सेंटर्सना केलेय. रुग्णांंमध्ये वाढ झाली तर मात्र परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. सध्या रेमडेसिव्हीरची मागणी वाढली आहे. आपल्याला ५० हजार इंजेक्शनची गरज आहे. केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीरच्या वाटपाचं नियोजन आपल्याकडे घेतलं आहे. सुरुवातीला केंद्राने २६ हजारच्या आसपास इंजेक्शन मिळतील, अशी व्यवस्था केली होती. नंतर मी मागणी केल्यानंतर आता केंद्राने ४३ हजार इंजेक्शन देण्याचे मान्य केले. सध्या ३५ हजाराच्या आसपास आपल्याला रोज इंजेक्शन मिळत आहेत. गरज नसताना रेमडेसिव्हीर वापरू नका. गरज नसताना हे इंजेक्शन वापरले तर त्याचे दुष्परिणाम होण्याचे शक्यता टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे गरज असेल तर रेमडेसिव्हीरचा वापर करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय.

बेड वाढवू शकतो, सुविधा वाढवू शकत नाही

राज्यात बेड्स वाढवले आहेत. जूनमध्ये ३ लाख ३६ हजार होते. आता त्या ४ लाख ३१ हजार आहेत. राज्यात आयसीयू बेड्स ११८८२ होते, आता २८९०० बेड्स आहेत. जूनला ३७४४ वेंटिलेटर्स होते. सध्या ११ हजार व्हेंटिलेटर्स आहेत. आपण बेड वाढवू शकतो. पण डॉक्टर, नर्सेस वाढवणे कठीण आहे. विचार केल्यावर एसीमध्ये बसूनसुद्धा घाम फुटतो. बेड वाढवू शकतो, सुविधा वाढवू शकत नाही. डॉक्टर, नर्सेस आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. बाहेरून मिळणाऱ्या ऑक्सिजनचे आपण पैसे देतो. तसेच ऑक्सिजनच्या वाहतुकीचे पैसे देऊन वेळेवर ऑक्सिजन सर्वत्र पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण ही परिस्थिती बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करतोय. रुग्ण संख्या ही स्थिरावलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

आपल्याला थांबता येणार नाही. ब्रिटननं त्यांच्या लोकसंख्येतला मोठा टप्पा लसीचा पहिला डोस देऊन सुरक्षित केला आहे. उद्यापासून आपण १८ ते ४४ या वयोगटातल्या नागरिकांचं लसीकरण आपल्याला जसा लसीचा पुरवठा होईल, तसं सुरू करणार आहोत. कालही कोविन अ‍ॅप क्रॅश झालं. सर्व राज्यांना आपापली अ‍ॅप तयार करण्याची परवानगी केंद्रानं द्यावी. ही सर्व अ‍ॅप केंद्र सरकारच्या अ‍ॅपशी जोडता येतील. अ‍ॅपवर नोंदणी करून लसीकरण जिथे असेल, तिथे आपण जावं. लसीचा पुरवठा मर्यादित आहे. जून-जुलैपर्यंत हे उत्पादन वाढेल.

त्यासोबत लिक्विड ऑक्सिजनची ने-आण शक्य असते, पण गॅस ऑक्सिजनची वाहतूक शक्य नसते. मग जिथे गॅस ऑक्सिजन असेल, तिथे आपण कोविड सेंटर उभारतो आहोत. त्यामुळे ऑक्सिजन रुग्णापर्यंत नेणं शक्य नसेल, तर रुग्णाला ऑक्सिजनपर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. राज्य सरकार आपल्या खर्चाने २७५ पीएसए ऑक्सिजन प्लांट लावत आहे. येत्या काही दिवसांत ते कार्यान्वित होतील.

कालच मी राज्यातल्या जिल्हाधिकार आणि विभागीय आयुक्तांची बैठक घेतली. राज्यातल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटची उभारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी २० ते २५ दिवसांचा काळ लागू शकतो. येत्या काही दिवसांत आपले हे सगळे प्लांट सुरू होतील. पण कोविडची तिसरी लाट आली, तरी ऑक्सिजन कुठेही कमी पडणार नाही ही तयारी आपण केली आहे. पण कोविडच्या तिसऱ्या लाटेची वेळ येऊ नये ही माझी प्रार्थना आहे.

गेलं वर्ष फार तणावात गेलं. आणि तो तणाव कमी होण्याऐवजी अधिकच वाढला आहे. आपली यंत्रसामग्री देखील उसंत न घेता चालू आहे. त्या देखील किती ताण सहन करणार. गेल्या काही दिवसांमध्ये काही ठिकाणी दुर्घटना घडत आहेत. नाशिक, विरार अशा दुर्घटना घडताना दिसत आहेत. मग जिवावर उदार होऊन डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय असे आपले कर्मचारी हताश होतात. नाशिक दुर्घटनेनंतर मी तिथल्या कर्मचाऱ्यांशी झूमवर बोललो. काहीजण माझ्याशी बोलतानाच रडायला लागले.

आता पावसाळा जवळ आला आहे. त्यासाठी राज्यात सध्या राज्यातल्या सगळ्या जम्बो कोविड सेंटर्सचं स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करण्याचे निर्देश मी दिले आहेत. ज्या दुर्घटना घडण्याची शक्यता आहे, त्या टाळण्याचा प्रयत्न करा.

जगभरात लाटांमागून लाटा येत आहेत. आपण किती प्रयत्न करतोय, त्यावर किती लाटा येणार आहेत ते अवलंबून असेल. राज्यात सध्या दुसरी लाट आली आहे. तज्ज्ञ सांगतायत की तिसरी लाट देखील येणार आहे. मग आत्तापासूनच आपण तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. तिसरी लाट आली तरी त्याचे घातक परिणाम राज्यावर होऊ न देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कंबर कसून उतरलं आहे. लाट आल्यानंतर निर्बंध लावण्याची गरज लागलीच, तरी अर्थचक्र थांबता कामा नये. आपण सर्व पातळीवर प्रयत्न करतो आहोत. ही तिसरी लाट आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण थोपवल्याशिवाय राहणार नाही.

सुरुवातीला काहींनी टीका केली. महाराष्ट्रात कसे रुग्ण वाढत आहेत, लॉकडाउन लावू नका, आम्ही सहन करणार नाही. पण जर आपण लॉकडाउन लावला नसता, तर काय परिस्थिती उद्भवली असती, हे देशातलं इतर चित्र पाहिल्यावर लक्षात येतं. आपल्यानंतर आजूबाजूच्या राज्यांनीही लॉकडाउन लावले आहेत.

मी गेल्या वेळी साडेपाच हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं. शिवभोजन थाळी पुढचे २ महिने मोफत देतो आहोत. या काळात १५ लाखांहून अधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. आत्तापर्यंत ३ कोटी ९४ लाख लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ झाला आहे. राज्यात ८९० शिवभोजन थाळी केंद्र सुरू झाली आहेत.

गेल्या वर्षी १ मे ला लॉकडाउनच होता. याही वर्षी फारसा फरक नाहीये. हे काय दुष्टचक्र मागे लागलंय ते कळत नाहीये. साधारण आपण लॉकडाउन सदृश्य निर्बंध घातले आहेत. तुम्ही बंधनं टाकली तर त्यावर झालं काय? कालच उच्च न्यायालयाने विचारलं आहे की आजच्या बंधनांपेक्षा अधिक कडक लॉकडाउन लावण्याची आवश्यकता आहे का? मला वाटतं याहून कडक निर्बंध लादण्याची आवश्यकता फारशी येणार नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत.

नेमक्या या बंधनांचा आपल्याला काय उपयोग झाला? रुग्णसंख्या ओसरली नाही. पण निर्बंध लावण्याआधी ज्या वेगाने रुग्णवाढ होत होती, त्याच वेगाने झाली असती, तर आज राज्यात ९ ते १० लाख अॅक्टिव्ह रुग्ण राहिले असते. त्या दिवशी बंधनं घालताना मलाही जड जात होतं. पण करू काय? आपण माझं ऐकलंत, त्यामुळे ९-१० लाख अॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता आपण ६-६३० लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे.

अजून काही काळ आपल्याला ही बंधनं पाळण्याची आवश्यकता आहे. ही बंधनं लावणं सोपं आहे पण पाळणं अवघड आहे. नाईलाजाने आपली रोजी मंदावेल पण रोटी थांबू देणार नाही असं मी म्हणालो होतो. काहींना वाटतं की केंद्राने जे केलं त्याप्रमाणे आपण करायला हवं. कुणा आपल्यापेक्षा चांगलं काही केलं असेल, तर ते करायला मला काहीही वाटणार नाही. मी कुणाचंही अनुकरण करायला तयार आहे. पण हा सल्ला देताना खरंच आपल्या सरकारने काय केलं, हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button