स्पोर्ट्स

आयपीएल : जेसन रॉय हैदराबाद संघात दाखल

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी (IPL 2021) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) संघामध्ये डेव्हिड वॉर्नगरसारखाच सिक्सर खेचणारा इंग्लंडचा ओपनर फलंदाज जेसन रॉय (Jayson Roy) दाखल झाला आहे. आक्रमक फटके खेळण्यात आणि षटकार ठोकण्यात तो डेव्हिड वॉर्नरसारखाच (David Warner) आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात खेळताना मला आनंद होतोय, अशी प्रतिक्रिया जेसन रॉय याने दिली आहे.

सनरायजर्स हैदराबादने जेसन रॉयला दोन कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये खरेदी केलं आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत जेसन रॉयची कामगिरी ठीक होती परंतु चांगल्या आणि आश्वासक सुरुवातीनंतर त्याला मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आलं. जेसन रॉयने 2017 साली गुजरात लॉयन्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तसंच 2018 मध्ये तो दिल्लीकडून खेळला. इंग्लंडकडून ओपनिंगला येऊन सुरुवाचीच्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी करण्यात जेस रॉय माहिर आहे. पॉवरप्लेमध्ये तो आक्रमक फटके खेळण्यात तरबेज आहे. जागेवरुन षटकार ठोकण्यातही तो माहिर आहे. चौकार आणि षटकारांनी तो अधिक धावा करतो.

जेसन रॉयने आतापर्यंत 8 मॅचेसमध्ये 179 रन्स केले आहेत. 9 मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल सामन्यांत हैदराबाद संघात मिशेल मार्शच्या जागी जेसन रॉयचा समावेश केला गेला आहे. मिशेल मार्श वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल खेळू शकणार नाही. त्याच्या जागी जेसन रॉय खेळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button