Top Newsतंत्रज्ञान

‘इंटरनेट एक्सप्लोरर’ २०२२ मध्ये निवृत्त होणार, मायक्रोसॉफ्टची घोषणा

मुंबई : मागील २५ वर्षांपासून सेवा देणारे इंटरनेट एक्सप्लोरर आता बंद करण्याचा निर्णय मायक्रोसॉफ्टने घेतला आहे. पुढच्या वर्षी १५ जून २०२२ पासून इंटरनेट एक्सप्लोरर बंद होणार असून त्याची जागा ‘मायक्रोसॉफ्ट एज्’ घेणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे.

विंडोज् १० वरील ‘इंटरनेट एक्सप्लोरर’ची जागा आता ‘मायक्रोसॉफ्ट एज्’ घेणार आहे अशी घोषणा मायक्रोसॉफ्ट एजचे प्रोग्रॅम मॅनेजर सीन लिंडरसे यांनी केली आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ११ डेस्कटॉप अ‍ॅप्लिकेशन हे १५ जून २०२२ रोजी आता निवृत्त होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

मायक्रोसॉफ्ट एज् इंटरनेट एक्सप्लोरर मोडची निर्मिती कंपनीने दोन वर्षांपूर्वीच केली आहे. ते आता बऱ्यापैकी अनेक व्यवहारांची जागा घेत आहे. तसेच जुन्या वेबसाईटची जागा हे क्रोमिअम आधारित ब्राऊजर घेणार असून त्यासंबंधी अनेक व्यवहारही त्याने अ‍ॅडॉप्ट केले आहेत. इंटरनेट एक्सप्लोरर मोड ही जुन्या अ‍ॅक्टिव्ह एक्स कन्ट्रोल साईट असून त्याचा उपयोय अजूनही अनेक व्यवहारांसाठी होतोय. गेल्या वर्षी मायक्रोसॉफ्टने आपल्या मायक्रोसॉफ्ट टीमच्या वेब अ‍ॅपचा इंटरनेट एक्सप्लोरर सपोर्ट काढून घेतला होता. त्यानंतर या वर्षीच्या शेवटापर्यंत मायक्रोसॉफ्टच्या ३६५ सेवांचा इंटरनेट एक्सप्लोररचा सपोर्ट काढून घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस ३६५, वनड्राईव्ह, आऊटलूक आणि इतर सेवांचा सपोर्ट १७ ऑगस्टनंतर बंद करण्यात येणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपल्या ग्राहकांनी इंटरनेट एक्सप्लोररचा वापर बंद करावा यासाठी मायक्रोसॉफ्टकडू प्रयत्न केले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button