आंतरराष्ट्रीय उड्डाणे ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित

नवी दिल्लीः कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणे ३१ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, वंदे भारत मिशनअंतर्गत दोन देशांमधील विमानसेवा सुरू राहणार आहे. वंदे भारत मिशन अंतर्गत हवाई दल अंतर्गत दोन देशांदरम्यान सध्या हवाई सेवा सुरू आहे.
कोरोनामुळे २३ मार्च २०२० रोजी देशातील शेड्युल व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सेवा थांबविली गेली. गेल्या १७ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची सामान्य सेवा विस्कळीत झालीय. फ्लाईट निलंबनासंदर्भात डीजीसीएकडून नवीन आदेश जारी करण्यात आलाय. हा नियम आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानांना लागू होणार नाही. कोरोना संकट सुरू झाल्यापासून शेड्युल आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद केली गेली. गेल्या एक वर्षापासून वंदे भारत मिशनअंतर्गत एअर बबल अंतर्गत आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू आहे. एप्रिल महिन्यात जेव्हा दुसर्या लाटेचा धोका वाढला, तेव्हा डझनभर देशांसह हवाई संपर्क पुन्हा एकदा बंद झाला. सुमारे २० देशांनी भारतातून ये-जा करणाऱ्या प्रवासी विमानांवर बंदी घातली होती. दुसरी लाट संपल्यानंतर स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी, मालदीव, कतारसारख्या देशांनी पुन्हा हवाई संपर्कांना परवानगी दिली.




