महागाई म्हणजे मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसुली : राहुल गांधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ते ट्विटरच्या माध्यमाने सातत्याने सरकारवर निशाणा साधत असतात. ते अनेक वेळा ट्विटरच्या माध्यमाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांनी महागाईच्या मुद्यावरून सरकारला लक्ष केले आहे. ते म्हणाले, देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे आणि मोदी सरकार टॅक्स वसुली करण्याच्या नादात लागले आहे.
खासदार राहुल गांधी यांनी ट्विट करत लिहिले आहे, सर्वच सामान महाग होत चालले आहे. ग्राहक त्रस्त आहेत. पण याचा थोडाही फायदा छोटे उत्पादक, दुकानदार अथवा शेतकऱ्यांना होत आहे का? नाही! कारण, ही महंगाई म्हणजे खरे तर मोदी सरकारची अंधाधुंद टॅक्स वसुली आहे.
सब सामान महंगा होता जा रहा है- उपभोक्ता परेशान हैं। लेकिन क्या इसका थोड़ा भी फ़ायदा छोटे उत्पादक, दुकानदार या किसान को हो रहा है?
नहीं!
क्यूँकि ये महंगाई असल में मोदी सरकार की अंधाधुंध टैक्स वसूली है।#TaxExtortion
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 30, 2021
तत्पूर्वी, खासदारांनी जनतेचा आवाज बनून राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे, असा आपल्या लोकशाहीचा पाया आहे. मोदी सरकार विरोधकांना हेच काम करू देत नाही. संसदेचा आणखी वेळ वाया घालवू नका. महागाई, शेतकरी आंदोलन आणि पेगॅसस हेरगिरीवर चर्चा करावी, असे ट्विट राहुल गांधी यांनी गुरुवारी केले होते.