Top Newsराजकारण

अर्थव्यवस्थेला ‘डबल ए व्हेरिअंट’ची लागण, सगळीकडे अदानी-अंबानी; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : देशातील फॉर्मल सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. दोन सर्वात मोठ्या उद्योगपतींबाबतही मी बोलणार आहे. कोरोनाच्या काळात वेगवेगळे व्हेरिअंट आले. हे दोन देखील वेगळे व्हेरिअंट आहेत की जे देशाच्या अर्थव्यवस्थेत पसरले आहेत. देशातील सर्व एअरपोर्ट्स, बंदरं, पॉवर, ट्रान्समिशन, खाणकाम, हरित उर्जा, गॅस, खाद्यतेल क्षेत्रात आता अदानी दिसत आहेत. तर अंबानींना टेलिकॉम, पेट्रोकेमिकल्स आणि ई-कॉमर्स क्षेत्रात एकाधिकारीशाही निर्माण करू दिली आहे. त्यामुळे सारी संपत्ती या दोघांकडेच जात आहे. सर्व ठिकाणी अदानी आणि अंबानीच आहेत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर ताशेरे ओढले आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अर्थसंकल्पीय अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर बोलत होते. ते म्हणाले की, राष्ट्रपतींचं अभिभाषण हे सत्यापासून खूप दूर होतं. गेल्या वर्षभरात ३ कोटीहून अधिक तरुणांना नोकरी गमावली. बेरोजगारीचा साधा उल्लेख देखील त्यांच्या भाषणात नव्हता, असं राहुल गांधी म्हणाले. तसंच गेल्या ५० वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी यावेळी भारतात असल्याचा दावा देखील राहुल गांधी यांनी केला आहे.

यूपीएच्या सरकारनं देशात दरवर्षी २७ कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर आणण्याचं काम केलं होतं आणि या सरकारनं २३ कोटी जनतेला पुन्हा गरीबीत ढकलण्याचं काम केलं आहे, असंही राहुल गांधी म्हणाले. मोदी सरकारनं नोटबंदी आणि जीएसटीनं देशातील असंघटीत क्षेत्र नष्ट करण्याचं काम केलं आहे. यानंतर भारताचे दोन तुकडे झाले. एक श्रीमंताचा भारत आणि दुसरा गरिबांचा भारत, असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधींनी लोकसभेत केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, एक श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरिबाचा भारत, अशा प्रकारचे दोन भारत तयार होत आहेत. देशात दोन भारत तयार करण्याचं काम मोदी सरकारने केलं आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रेल्वेच्या नोकरीसाठी आणि रोजगार प्राप्त होण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी काय केलं आणि नक्की येथे काय घडलं याबाबत कोणतंही वक्तव्य करण्यात आलं नाही. मागील वर्षात तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केलाय.

राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकार निशाणा साधला आहे. देशातील गरीब लोकांजवळ आज रोजगार नाहीये. तसेच याबाबत राष्ट्रपतींनी सुद्धा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे संपूर्ण भारतातील युवक रोजगार शोधण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक राज्यातील युवक रोजगाराच्या मागे आहे. परंतु तुमचं सरकार रोजगार देऊ शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.

२०२१मध्ये तीन कोटी युवकांनी आपला रोजगार गमावला आहे. ५० वर्षांपेक्षा अधिक बेरोजगारी आज भारतात आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्ट अप इंडिया यांच्याबाबत जरी सरकारने उल्लेख केला असला तरीदेखील युवकांना रोजगार प्राप्त होत नाहीये. हीच खरी वस्तुस्थिती आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

राष्ट्रपतींनी देशातील बेरोजगारांबाबत एकही शब्द काढला नाही. रोजगाराची प्राप्ती कुठून आणि कशी करण्यात आली. याबाबत सरकारने शब्दही काढला नाही आणि जरी सरकारने याबाबत उल्लेख केला तरी युवकांना त्यांच्यावर विश्वास बसणार नाही. गरीबांचा पैसा देशातील बड्या उद्योगपतांना देण्यात आला. गेल्या सात वर्षामध्ये असंघटीत क्षेत्रातील आणि लघु उद्योगातील अनेक रोजगार बुडाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button