Top Newsस्पोर्ट्स

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत भारताच्या खेळाडूंना रौप्य, कांस्य पदक !

टोक्यो : भारताची टोक्यो पॅरालिम्पिकमधील शानदार कामगिरी सुरुच आहे. आतापर्यंत आठ पदकं पटकावलेल्या भारतीय खेळाडूंनी आता एकाच खेळात दोन पदकं खिशात घातली आहेत. उंच उडी स्पर्धेत दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावत भारताने रौप्य आणि कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. यामध्ये मरियप्पन थंगावेलुने रौप्य, तर शरद कुमारने कांस्य मिळवलं आहे. यामुळे भारतीयांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. दोघांनी उंच उडीच्या टी६३ स्पर्धेत हे य़श मिळवलं आहे. थंगावेलुने रिओ पॅरालिम्पिकनंतर सलग दुसऱ्यांदा पदक जिंकलं आहे. तर रिओमध्ये कांस्य जिंकणारा वरुण सिंह भाटी यंदा पदक जिंकण्यात अयशस्वी ठरला आहे.

https://twitter.com/ianuragthakur/status/1432672707292794885

भारताच्या शरद कुमारने सुरुवातीलाच आघाडी घेत १.८३ मीटरची उंच उडी घेतली. त्यानंतर तो १.८६ मीटरची उडी घेण्याच्या प्रयत्नात अयशस्वी ठरला. त्यामुळे केवळ भारताच्या मरियप्पन आणि अमेरिकेच्या ग्रीव सॅम यांच्यात १.८६ मीटरचा मार्क गाठण्याची स्पर्धा होती. मरियप्पन तिन्ही प्रयत्नात १.८६ मीटरचा मार्क गाठू शकला नाही. पण अमेरिकेच्या ग्रीवने तिसऱ्या प्रयत्नात मार्क गाठला आणि सुवर्णपदकावर नाव कोरलं. ज्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर असेलल्या मरियप्पनला रौप्य आणि शरदला कांस्य मिळालं.

भारताच्या खिशात १० पदक

भारताने आतापर्यंत ८ पदकं मिळवली आहेत. ज्यामध्ये दोन सुवर्णपदकांसह चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. आता उंच उडीमध्ये मरियप्पन थंगावेलु आणि शरद कुमार यांनी रौप्य आणि कांस्य पदक मिळवून दिल्यामुळे भारताकडे दोन पदकं वाढली आहेत. ज्यामुळे भारताच्या खात्यात एकूण १० पदकं झाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button