दुबई : टी२० विश्वचषकामध्ये पाकिस्तानच्या संघाकडून पहिला सामना पराभूत झालेल्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये ‘करो या मरो’ची स्थिती आहे. दोन्ही संघ आपल्या पहिल्या पराभवाचे शल्य बाजूला ठेवून विजयासाठी प्रयत्न करतील. सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने चांगलीच तयारी केली असेल परंतु विश्वचषकामध्ये कधीही पराभव न करु शकलेल्या न्यूझीलंड संघासमोर भारतीय खेळाडू किती काळ तग धरुन राहतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मागील रविवारी पाकिस्तानने भारताला १० विकेट राखून पराभूत केलं होते. भारताकडून १५१ धावांचे आव्हान पाकिस्तानला देण्यात आले होते सलामीर फलंदाजांनी सर्वोत्कृष्ट खेळी करत हे आव्हान संपुष्टात आणून विजय मिळवला होता.
भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात चांगल्या तयारीने उतरावे लागणार आहे. टी२० विश्वचषकामध्ये दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. यामुळे दोघांनाही हा सामना जिंकणे फार महत्त्वाचे आहे. टीम इंडिया ५ पैकी १ सामन्यात पराभूत झाली आहे. जर रविवारी होणाऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला तर येणारे ३ सामने जिंकावे लागणार आहेत. अशीच परिस्थिती न्यूझीलंडची असल्यामुळे दोघांसाठी हा सामना अटीतटीचा होणार आहे.
न्यूझीलंड सारख्या कधीही न पराभव करु शकलेल्या टीम समोर भारताला विजय मिळवणं आव्हानात्मक आहे. परंतु न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन फिट नाही, तर मार्टिन गुप्टिलच्या पायालाही दुखापत झाली आहे. डेवोन कोंवे वेगवान गोलंदाज आहे. भारताच्या गोलंदाजांचे पाकिस्तानविरुद् काही चालले नाही परंतु न्यूझीलंडविरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे.
भारताचा गोलंदाज हार्दिक पांड्या आणि खराब प्रदर्शनचा सामना करणारा भुवनेश्वर कुमार भारतीय टीमसाठी कमजोर ठरत आहेत. कंबरेच्या दुखापतीनंतर हार्दिक पांड्याने वापसी केली परंतु खराब फॉर्ममुळे त्याच्या करियरचा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, इशान किशन, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार वरुण चक्रवर्ती, राहुल चाहर
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉड अॅस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमॅन, डेवोन कोंवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, काइल जेमिसन, डॅरिल मिशेल, जिम्मी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनेर, टिम सीफर्ट, ईश सोढी, टिम साउदी