ओव्हल : ५ फलंदाज ६२ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडनं चौथ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवलं. उमेश यादवनं टीम इंडियाला सामन्यावर पकड मिळवून दिली होती, परंतु ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांनी ती पकड सैल केली. या दोघांच्या ८९ धावांच्या भागीदारीनं इंग्लंडनं आघाडीच्या दिशेनं वाटचाल केली. बेअरस्टो बाद झाला, परंतु पोपला अष्टपैलू मोईन अलीची साथ मिळाली. पोपच्या दमदार खेळीनं पहिल्या डावात इंग्लंडला दिलेल्या ‘होप’मुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली. त्यात संघात कमबॅक करणाऱ्या ख्रिस वोक्सनं गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही तुफान फटकेबाजी केली. ५ बाद ६२ धावांवरून इंग्लंडनं २९० धावांची मजल मारून पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा डाव गुंडाळण्यात भारताला चांगलेच कष्ट घ्यावे लागले. दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली आहे. दिवसअखेर रोहित शर्मा (२०) आणि लोकेश राहुलने (२२) १६ षटकात ४३ धावांपर्यंत मजल मारली आहे. अद्याप इंग्लंड ५६ धावांनी आघाडीवर आहे.
चौथ्या कसोटीत इंग्लंडनं ओली पोप व ख्रिस वोक्स यांना संघात स्थान दिले. या दोघांनीच टीम इंडियाचे कंबरडे मोडले. ५ बाद ६२ अशा दयनीय अवस्थेत असलेल्या इंग्लंडसाठी पोव व जॉनी बेअरस्टो ही जोडी धावून आली. त्यानंतर पोपनं चतूर खेळ केला. वोक्सनं अखेरच्या विकेटसाठी तुफान फटकेबाजी करताना इंग्लंडला पहिल्या डावात ९९ धावांची आघाडी मिळवून दिली. इंग्लंडनं पहिल्या डावात २९० धावा केल्या. उमेश यादवनं सर्वाधिक ३, तर रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारतानं दुसऱ्या डावात बिनबाद ४३ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा २० व लोकेश राहुल २२ धावांवर खेळत आहेत. या जोडीनं आज १९३६ सालचा विक्रम मोडला.
५ फलंदाज ६२ धावांवर माघारी परतूनही इंग्लंडनं चौथ्या कसोटीत पहिल्या डावात आघाडी घेण्यात यश मिळवलं. ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांच्या ८९ धावांच्या भागीदारीनं इंग्लंडनं आघाडीच्या दिशेनं वाटचाल केली. बेअरस्टो बाद झाला, परंतु पोपला अष्टपैलू मोईन अलीची साथ मिळाली. संघात कमबॅक करणाऱ्या ख्रिस वोक्सनं गोलंदाजीपाठोपाठ फलंदाजीतही तुफान फटकेबाजी केली. शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संघासाठी देवासारखा धावला. त्याच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात पोप त्रिफळाचीत झाला. त्यानं १५९ चेंडूंत ८१ धावा काढल्या.
बेअरस्टो बाद झाला तेव्हा इंग्लंडचा संघ ४० धावांनी पिछाडीवर होता. पोप व अलीनं त्यानंतर सूत्र हाती घेतली. पोपनं अर्धशतक पूर्ण करताना अलीसोबत अर्धशतकी भागीदारीही केली. या दोघांच्या या भागीदारीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी घेता आली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर अली पायचीत होता, पण टीम इंडियाच्या एकाही खेळाडूला त्यासाठी अपील करण्याची गरज भासली नाही. सुरुवातीला चेंडू अलीच्या पायावर आदळण्यापूर्वी बॅटला लागल्याचा अंदाज खेळाडूंना होता, परंतु रिप्लेत चेंडू थेट अलीच्या पायाला लागला अन् तो चेंडू यष्टींवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसले. पण, अलीला ( ३७ धावा) त्याचा फायदा उचलता आला नाही. रवींद्र जडेजानं त्याला बाद केले. अली व पोप यांची ७१ धावांची भागीदारी त्यानं संपुष्टात आणली.
शार्दूल ठाकूर पुन्हा एकदा संघासाठी देवासारखा धावला. त्याच्या चेंडूवर कट मारण्याच्या प्रयत्नात पोप त्रिफळाचीत झाला. त्यानं १५९ चेंडूंत ८१ धावा काढल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव गुंडाळण्यात भारताला थोडे कष्ट घ्यावे लागले. ख्रिस वोक्सनं फटकेबाजी केली. वोक्सनं ५८ चेंडूंत ११ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. पण, एक धाव काढण्याच्या प्रयत्नात तो धावबाद झाला.