आजपर्यंत जगदाळे फाऊंडेशन आणि नाशिक बार असोसिएशनच्या माध्यमातून तीनदा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. जगदाळे यांच्या उपक्रमास नेहमीच नाशिक बारचे सहकार्य राहिले आहे. नाशिक बारचे विद्यमान अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्या पदभार काळात २०१३-१४, २०१७-१८ आणि २०२१ मध्येही अॅड. जगदाळे यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. नेटके आणि शांततेने केलेल्या आयोजनामुळे कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या न्यायाधीशांनी तसेच मान्यवरांनी शाबासकीची थापच दिली आहे. क्रिकेट स्पर्धातील सहभागाने व्यवसायातील ताण-तणाव हलके होतात. एकोपा आणि सांघिक भावना वाढीस लागते. बाहेरच्या जिल्ह्यातील वकील नाशिकमध्ये खेळण्यास उत्सुक असतात. त्यामुळे इतर ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमधील सहभाग आणि नाशिकमधील खेळाडूंची संख्या यात तफावत असतेच. नेहमीच्या व्यस्ततेतून थोडावेळ काढून नवीन उत्साह घ्यायचा असेल, तर खेळलेच पाहिजे. फक्त क्रिकेटच नाही तर इतर खेळांचेही नाशिक बारकडून आयोजन होते. प्रत्येक स्पर्धा स्मरणार्थ राहील याची जबाबदारी घेतली जाते. खेळण्यासाठीच नाही तर नाशिक बरच्या माध्यमातून वकिलांच्या गुणवत्तेसाठी पूरक वातावरण असावे यावर कटाक्ष दिला जातो. बारचे प्रत्येक पदाधिकारी यासाठी जाणीवपूर्वक काम करीत आहेत. यंदाची स्पर्धा ही नाशिक बार आणि जगदाळे फाऊंडेशनची नवी ओळख निर्माण करणारी आणि महाराष्ट्रातील वकिलांमध्ये अधिक आपुलकी निर्माण करणारी असेल, हे नक्की.