परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; कुख्यात गुंड रवि पुजारीची ऑडिओ क्लिप व्हायरल
मुंबई : परमबीर सिंग खंडणी प्रकरणात आता एक ऑडिओ क्लिपमुळे खळबळ माजली आहे. सध्या रवि पुजारी तुरुंगात आहे. मात्र ऑडिओ क्लिप मधील आवाज रवि पुजारीचा असून क्लिप जुनी आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रवि पुजारी आणि रितेश शहा यांच्यात संभाषण ऐकायला येत आहे. रितेश शहा यांनी सोनू जलान यांच्याविरोधात तक्रार केली होती. यामुळे रवि पुजारीने रितेश शहाला धमकावले आहे. सोनू जलान विरोधात रितेश शहा तक्रार करत होता. यामुळे सोनू जलानने रवि पुजारीला सांगितले. रवि पुजारीने रितेश शहाला फोन करत सोनू जलान माझा पार्टनर असून त्याला पुन्हा त्रास दिला तर मारुन टाकेल अशी धमकी दिली आहे. तसेच घरातील सदस्यांनाही सोडणार नाही अशी धमकी रितेश शहाला रवि पुजारीने फोनवर दिली आहे. मात्र या ऑडिओला पोलिसांनी दुजोरा दिला नाही.
माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणी गोळा करण्याचे आरोप करण्यात आले आहेत. खंडणी प्रकरणात परमबीर सिंग आणि अन्य साथीदारांच्या विरोधात लुक आउट नोटीसही जारी करण्याची तयारी झाली आहे. परंतू परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढच होत आहे. कुख्यात गुंड रवि पुजारी आणि बुकी रितेश शहा यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रवि पुजारीकडून रितेश शहाला धमकी देण्यात आली आहे. यामुळे परमबीर सिंग खंडणी प्रकरणाला आता नवं वळण आलं आहे.
माजी पोलीस महासंचालक पी.के.जैन यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, ही जी ऑडिओ क्लिप आहे ती २०१६ ते २०१७ सालची आहे. काही लोकांनी केलेल्या तक्रारीमुळे रवि पुजारीवर कारवाई झाली. यामुळे रवि पुजारीवर कारवाई केल्यामुळे गुंडांना अटक करण्यात आली आहे. यामुळे गुंडगिरी संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये रवि पुजारी म्हणतो की, सोनू जलान हा त्याचा माणूस आहे. रितेश शहाने तक्रार केल्यामुळे रवि पुजारीने त्याला फोन केला होता. त्यांच्यातील काही आर्थिक व्यवहारावरुन हा फोन करण्यात आला होता. काही लोकांनी पुढे येऊन रवि पुजारीविरोधात तक्रार केल्यामुळे ठाणे पोलिसांनी मोक्का लावत रवि पुजारीला अटक केली आहे.
गुंड रवि पुजारीला अटक करण्यात आल्यानंतर आता वातावरण बदलत आहे. यामुळे सोनू जलान याने पुढे येऊन पोलिसांविरोधात तक्रार दाखल केली आहे. सोनू जलान आणि रितेश शहा हे सुद्धा अंडरवर्ल्डशी कनेक्टेड आहेत. रितेश शहा एक बुकी आहे. यामुळे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. दोघेही खंडणीसाठी गुंडांच्यामार्फत धमकी द्यायचे. सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी आता माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि त्यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. तसेच खंडणी प्रकरणात एवढे पैसे आणले कुठून याची चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी पोलीस महासंचालक पी.के.जैन यांनी दिली आहे.