अर्थ-उद्योग

एल अँड टी स्किल ट्रेनर्स अकॅडमीचे उद्घाटन

‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स’ अभ्यासक्रमाअंतर्गत दरवर्षी १५०० कुशल प्रशिक्षक तयार करण्याचे ध्येय

मुंबई : एल अँड टी स्किल ट्रेनर्स अकॅडमीचे (एसटीए) केंद्रीय मंत्री, कौशल्य विकास आणि उद्योजकता महेंद्र नाथ पांडे यांच्या हस्ते मढ आयलंड येथे उद्घाटन झाले. या कार्यक्रमासाठी एल अँड टी समूह आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) अध्यक्ष तसेच देशातील कौशल्य क्षेत्रातील दरी
भरून काढण्यासाठीच्या उपक्रमाचे नेतृत्व करणाऱ्या श्री. ए. एम. नाईक यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळेस मनीश कुमार- व्यवस्थापकीय संचालक आणि अतुल तिवारी – अतिरिक्त सचिव – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय हे ही उपस्थित होते. त्याचप्रमाणे एल अँड टी आणि एनएसडीसी संचालक मंडळाचे सदस्य तसेच सेक्टर स्किल कौन्सिल सीईओज यावेळी उपस्थित होते.

या अकॅडमीतर्फे देशाच्या कौशल्य विकास यंत्रणेत कार्यरत असलेल्या प्रशिक्षकांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. भारतात कौशल्य प्रशिक्षणाला यश मिळवून देण्यासाठी उच्च क्षमता असलेले प्रशिक्षक तयार करणे आवश्यक असल्याच्या श्री. नाईक यांच्या ठाम विश्वासातून या अकॅडमीला प्रेरणा मिळाली आहे. एल अँड टीच्या सध्याच्या केंद्रात स्थापन करण्यात आलेल्या या अकॅडमीमधे दरवर्षी १५०० प्रशिक्षक तयार करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक वर्ग, वर्कशॉप्स आणि हॉस्टेल सुविधा यांचा त्यात समावेश आहे. या अभ्यासक्रमामधे १० दिवसांचे वर्गातील शिक्षण व त्यानंतर १५ आठवड्यांचे ‘ऑन द जॉब’ (ओजेटी) प्रशिक्षण यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम सिंगापूर पॉलीटेक्निकने एनएसडीसीशी झालेल्या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून तयार केला आहे. या अभ्यासक्रमामधे अध्ययन शास्त्रावर भर देण्यात आला असून विषयाशी संबंधित कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स आणि जीवन कौशल्ये यांचा समावेश करून समग्र विकासावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

१० दिवसांच्या अभ्यासक्रमाच्या शेवटी उमेदवाराला विश्लेषण प्रक्रियेतून जावे लागते आणि पात्र ठरणाऱ्यांना २ वर्ष वैधता असलेले प्रमाणपत्र मिळते. ‘ओजेटी’नंतर पात्र ठरणाऱ्यांना आयुष्यभर वैध राहाणारे प्रमाणपत्र मिळते. याप्रसंगी एल अँड टी समूह आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एनएसडीसी) अध्यक्ष श्री. ए. एम. नाईक म्हणाले, ‘ही अकॅडमी केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण जगातील कौशल्यविषयक गरजा पूर्ण करण्याची क्षमता असलेला कुशल कर्मचारी वर्ग आपल्या देशात तयार करण्याच्या उद्देशातून स्थापन करण्यात आली आहे.’ अकॅडमीने १५ जानेवारी २०२१ रोजी आपला प्राथमिक अभ्यासक्रम सुरू केला असून आतापर्यंत १५० प्रशिक्षकांना यशस्वीपणे प्रशिक्षित केले आहे.
याप्रसंगी माननीय मंत्रीमहोदय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, डॉ. महेंद्र नाथ पांडे म्हणाले, ‘कौशल्य प्रशिक्षण अकॅडमी हे देशात कौशल्य विकासाचा प्रसार करण्याच्या दिशेने उचलण्यात आलेले क्रांतीकारी पाऊल आहे. हा महत्त्वाचा उपक्रम हाती घेतल्याबज्जल मी श्री. ए. एम. नाईक यांचे आभार मानतो.’

एनएसडीसी ही सार्वजनिक- खासगी भागिदारी असून कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाअंतर्गत काम करते. संस्थेचे प्रशिक्षक प्रशिक्षण पुरवठादार आणि जिल्हास्तरीय प्रमुख कौशल्य केंद्र म्हणजेच प्रधान मंत्री कौशल्य केंद्रांच्या (पीएमकेके) विस्तृत शाखांद्वारे लघुकालीन कौशल्य प्रशिक्षण पुरवले जाते. एल अँड टीच्या
कौशल्य प्रशिक्षण अकॅडमीने प्रशिक्षकांसाठी समग्र वातावरण तयार करून त्यांना विकसित होण्यासाठी, शिक्षण मिळवण्यासाठी पूरक वातावरण पुरवण्याचे व दरम्यान उद्योगक्षेत्रासाठी मौल्यवान कर्मचारीवर्ग तयार करण्याची संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एल अँड टी तरुणांना भव्य प्रकल्पांच्या वितरणासाठी देशभरात असलेल्या आपल्या प्रशिक्षण केंद्रांद्वारे तयार करत आहे. प्रशिक्षणातून मिळालेले कौशल्यपूर्ण शिक्षण ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स प्रोग्रॅम’साठी महत्त्वाचे मानले जाते. कित्येक दशकांपासून एल अँड टी वंचितांसाठी नवी कौशल्ये शिकण्याची आणि त्याच्या जोरावर रोजगार मिळवून जीवनमान उंचावण्याची संधी देत आहे. एल अँड टी ने आठ राज्यांत मिळून नऊ बांधकाम कौशल्य प्रशिक्षण संस्था सुरू केल्या असून त्याद्वारे तरुणांना थिअरी तसेच प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण दिले जाते. यातून त्यांना कुशल मनुष्यबळाची प्रचंड मागणी असलेल्या बांधकाम क्षेत्रात रोजगार मिळवता येतो. सीएसआर उपक्रमांद्वारे एल अँड टी वंचित स्त्रियांसाठी व्यावसायिक कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात आणि त्यांना टेलर, ब्युटिशिन, फुड प्रोसेसर्स, परिचारिका सहाय्यक बनवले जाते. मिळकतीची ताकद लाभल्यामुळे या स्त्रियांचे सामाजिक स्थान उंचावते आणि पर्यायाने स्त्रियांकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलण्यास मदत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button