अर्थ-उद्योग

सिटी बँक भारतासह १३ देशातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत

मुंबई : सिटी बँकच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती, म्हणजे आता सिटीबँक भारतासह १३ देशातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत आहे. सिटी बँकेने गुरुवारी घोषणा केली त्यात ते म्हणाले की, “भारत आणि चीनसह अजून १३ देशामधील कन्झ्युमर बिझनेस बँकिंग बंद करणार आहेत”. याबाबत त्यांनी सांगितले आहे की, “हा त्यांच्या ग्लोबल स्ट्रॅटेजीचा भाग आहे”.

सिटी बँकेच्या देशात ३५ शाखा आहेत. या सर्व शाखांमधील ग्राहक बँकिंग व्यवसायात सुमारे ४ हजार लोक काम करतात. या बँकेच्या ग्राहक बँकिंग व्यवसायात क्रेडिट कार्ड्स, रिटेल बँकिंग, गृह कर्जे आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे. सिटी बँक ही १३ देशांमधील ग्राहक बँकिंग व्यवसायतून बाहेर पडली. याबाबत सिटी बँकेचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी जेन फ्रेझर यांनी या निर्णयाचे कारण सांगितले की, ‘त्यांच्या मते हा कंपनीच्या धोरणात्मक नितीचा भाग आहे. तसेच या निर्णयाचे महत्त्वाचे कारण म्हणजे या भागात व्यावसायिक स्पर्धेत बँक कमी पडली. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे.’

सिटी बँकेने १९०२ मध्ये भारतात पाऊल ठेवले होते. तर १९८५ साली या सिटी बँकेने ग्राहक बँकिंग व्यवसायात पाऊल ठेवले. संस्थात्मक बँकिंग व्यवसायाव्यतिरिक्त सिटी बँक मुंबई, पुणे, बंगळुरु, चेन्नई आणि गुरुग्राम या केंद्रातून जागतिक व्यवसायावर लक्ष केंद्रीत करेल. दरम्यान, सिटी बँकेला आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये ४ हजार ९१२ कोटी रुपयांचा नफा मिळाला होता. तर आधीच्या वर्षात म्हणजेच २०१८-१९ या आर्थिक वर्षात ४ हजार १८५ कोटी नफा मिळाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button