अर्थ-उद्योग

कोरोना संकटात घर, आरोग्य सुरक्षा तंत्रज्ञानामधे गुंतवणूक करणाऱ्यांच्या संख्येत तिपटीने वाढ

मुंबई : देश वाढत्या कोविड केसेसचा सामना करत असताना आणि राज्य सरकारद्वारे विविध प्रकारचे प्रतिबंधात्मक व सुधारणात्मक उपाय जाहीर केले जात असताना गोदरेज सिक्युरीटी सोल्यूशन्सने त्यांच्या ‘ककून इफेक्ट ऑन होम अँड हेल्थ’ या नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर केले आहेत.

या अहवालानुसार एक तृतीयांश भारतीय (76.99 टक्के) आता घरी असताना आरोग्य आणि स्वास्थ्य सुरक्षेला पहिले प्राधान्य देत आहेत आणि केवळ 23.01 टक्के जण भौतिक वस्तूंच्या संरक्षणाला प्राधान्य देत आहेत. ही माहिती महासाथीच्या आधी आम्ही घर सुरक्षेवर आधारित केलेल्या अहवालापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. तेव्हा घरची मालमत्ता आणि भौतिक वस्तूंच्या संरक्षणाला प्रथम प्राधान्य देणाऱ्यांचा वाटा सर्वाधिक (51.95 टक्के) होता, तर आरोग्य व स्वास्थ्याला प्राधान्य देणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी (48.05) होते.

आरोग्याकडे पाहाण्याचा हा नवा दृष्टीकोन भारतीयांच्या खरेदी प्राधान्यक्रमातही दिसून येत आहे. कोविड- 19 येण्यापूर्वी एक चतुर्थांशापेक्षा नागरिक (26.34 टक्के) त्यांना देण्यात आलेल्या ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदी यादीमधे स्मार्टफोन खरेदी करण्यास प्राधान्य देत होते, तर स्वयंपाकघरातील वस्तू (19.26 टक्के), दागिने (16.0 टक्के) आणि यूव्ही स्टर्लायझर्ससारखी आरोग्यविषयक उपकरणे (12.83 टक्के) खरेदी करण्याकडे लोकांचा कल होता.

महासाथीनंतर आरोग्य उपकरणे खरेदीला 46.35 टक्के भारतीयांद्वारे सर्वाधिक प्राधान्य दिले जात असून त्यानंतर स्मार्टफोनय/टॅब्लेटचा (15.86 टक्के) आणि घरगुती मनोरंजक उपकरणे उदा. अलेक्सा आणि गुगल होम खरेदी करू इच्छिणाऱ्यांचा क्रमांक लागतो. 61 टक्के भारतीय स्त्रियांनी वेगवेगळे घर आणि आरोग्य सुरक्षा निकष, उत्पादनाचे फायदे आणि उपयुक्तता, संबंधित सक्षम अधिकृततेकडून प्रमाणीकरणाचे आकलन करून घेण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे या अहवालात दिसून आले आहे.

या संशोधनाविषयी गोदरेज सिक्युरीटीज सोल्यूशन्सचे उपाध्यक्ष मेहेरमोश पिथावाला म्हणाले, की महासाथ तसेच त्यामुळे आलेल्या मर्यादा व लॉकडाउनचे भारतीयांच्या आरोग्य सुरक्षा व सुरक्षेच्या संकल्पनांवर झालेल्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी हा अहवाल तयार करण्यात आला. ‘महासाथीमुळे एकंदर मानसिकतेमधे मोठा फरक पडला आहे. ‘सुरक्षित व स्वस्थ’ राहाणे म्हणजे आता केवळ मालमत्ता व चीजवस्तू सुरक्षित ठेवणे इतकाच अर्थ राहिलेला नाही. आता वैयक्तिक स्वच्छता आणि स्वास्थ्याची जोड त्याला मिळाली आहे. या महासाथीमुळे नागरिकांमधे बाहेरच्या जगापासून दूर घरातच सुरक्षित राहाण्याची भावना निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांची मानसिकता बदलली असून ते घर आणि आरोग्य सुरक्षाविषयक तयारीचा पुनर्मूल्यांकन करायला लागले आहेत,’ असे ते म्हणाले.

श्री. मेहरोश पिथावाला यांनी या अहवालामधे घरमालकांना अशा समस्यांप्रती जाणवणारी ‘सुरक्षा तूट’ सकारात्मक बदल असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. ‘मालमत्तेचा विषय येतो, तेव्हा लोकांमधे सुरक्षेविषयक असलेल्या जागरूकतेचे महत्त्व आणि सुरक्षा आणि त्याची खात्री करण्यासाठी आवश्यक योग्य उपकरणांची खरेदी यामधे कायमच दरी असायची. सुरक्षेच्या बाबतीत कायम बाहेरील दृष्टीकोन असायचा आणि आयुष्य सुरक्षित ठेवणे ही सरकार, संस्था, नागरिक कल्याण संघटना यांची प्रमुख जबाबदारी मानली जायची. आमच्या संशोधनात भारताची ‘सुरक्षा तूट’ ठळकपणे दर्शवण्यात आली असून त्यामधे आता तीव्र बदल होत आहे. याला कारण म्हणजे ग्राहक आता अंतर्बाह्य दृष्टीकोन ठेवून आपले घर व आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घेत आहेत.’

या संशोधनानुसार आता अर्ध्यापेक्षा कमी (48.88 टक्के) नागरिक त्यांच्या घरासाठी स्वच्छता व निर्जंतुकीकरण उपकरणांसाठी 25,000 रुपयांपर्यंत खर्च करण्यासाठी तयार आहेत. ‘गेल्या काही दशकांपासून भारतीय घरे सुरक्षित ठेवणारा एक विश्वासार्ह ब्रँड या नात्याने प्रत्येक भारतीयाचे घर व आरोग्य सुरक्षित करण्याच्या या लढ्यात त्यांना पाठिंबा देण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणे आमच्यासाठी जणू कर्तव्यच होते. बाजारपेठेच्या गरजांना प्रतिसाद देत आम्ही आरोग्य सुरक्षा श्रेणीमधे व्यवसायाचा विस्तार केला आहे आणि विविध उत्पादने लाँच केली आहेत. त्यात यूव्ही केस – हे आपल्या दैनंदिन वस्तू निर्जंतुक करणारे, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) प्रमाणित भारतातील पहिले उत्पादन, कॅश सॅनिटायझर, स्टरलायझर, सॅनिटायझर डिस्प्नेसरसह व्हिजी- गार्ड टर्नस्टाइल, शरीराचे तापमान मोजण्यासाठी ड्युएल सेन्सर थर्मल कॅमेरा या उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने भारताला न्यू नॉर्मलचा स्वीकार करत आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतील,’ असे ते म्हणाले.

घर आणि आरोग्य सुरक्षा उत्पादनांना असलेली मागणी व त्यांचा वाढता वापर लक्षात घेता आर्थिक वर्ष 2021-22 मधे देशातील आरोग्य आणि घर सुरक्षा बाजारपेठ 20 टक्के सीएजीआरसह रू. 450 कोटी रुपयांवर पोहोचेल असा अंदाज गोदरेज सिक्युरीटी सोल्यूशन्सने वर्तवला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button