ब्रिटनमध्ये खासदार डेविड एमेस यांची चर्चमध्ये हत्या
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या खासदाराची एका चर्चमध्ये चाकू मारून हत्या करण्यात आली. गंभीररित्या जखमी झालेल्या ६९ वर्षीय डेविड एमेस यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला.
डेविड एमेस हे चर्चमध्ये जिल्हातील मतदारांशी चर्चा करत होते. या जिल्ह्यात निवडणूक सुरु आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, डेविड एमेस यांच्यावर चाकूचे एकापेक्षा जास्त वेळा वार करण्यात आले. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. एमेस हे पूर्वेकडील इंग्लंडच्या एसेक्समध्ये साउथेंड वेस्टचे नेतृत्व करतात. त्यांच्या कार्यालयाने देखील हल्ल्याची पुष्टी केली मात्र अधिक माहिती दिली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नगरसेवक जॉन लैम्ब यांनी सांगितले की, त्यांच्यावर अनेक वेळा चाकू मारण्यात आला. त्यांची स्थिती गंभीर आहे. हे चांगले झाले नाही.
डेविड एमेस हे १९८३ मध्ये पहिल्यांदा बेसिल्डन येथून खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर ते १९९७ मध्ये साउथेंड वेस्ट येथून निवणूक लढविली होती. विरोधी पक्ष लेबर पार्टीचे नेते कीर स्टारर यांनी सांगितले की, ही भयानक आणि धक्कादायक बातमी आहे. त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांबाबत विचार करत आहे. एमेस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटल आणि त्यांच्या कार्यालयाने यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. एमेस हे वेळोवेळी त्यांच्या मतदारसंघातील लोकांना भेटत असत, त्यांच्याशी चर्चा करत असत. ते ब्रेक्झिटचे देखील खंदे समर्थक होते.