Top Newsफोकसराजकारण

राष्ट्रपती कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण

अदनान सामीवरुन मलिकांचा केंद्रावर निशाणा

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ११९ मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. यावेळी ७ मान्यवरांना पद्म विभूषण, १० जणांना पद्म भूषण आणि १०२ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. पद्म पुरस्कारांनी सन्मानित होणाऱ्या मान्यवरांमध्ये 29 महिलांचा समावेश आहे. तर १६ मान्यवरांना मरणोपरांत पद्म पुरस्कार देण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक अदनान सामी, अभिनेत्री कंगना राणावत यांना पद्मश्री तर मेरी कोम यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार ‘पद्म विभूषण’ प्राप्त मान्यवरांत दीर्घकाळापर्यंत जपानचं पंतप्रधान पद भूषणवणारे शिंजो आबे यांचाही समावेश आहे. पार्श्वगायक एस पी बालासुब्रमण्यम (मरणोत्तर) यांना पद्म विभूषण तर आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई (मरणोत्तर), माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान (मरणोत्तर), आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची मुलगी बान्सुरी स्वराज यांनी आपल्या आईच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला

२०२० साठी या मान्यवरांना पद्म विभूषण पुरस्कार

जॉर्ज फर्नांडिस (मरणोपरांत)
अरुण जेटली (मरणोपरांत)
सुषमा स्वराज (मरणोपरांत)
मॉरिशसचे माजी राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ (मरणोपरांत)
उत्तर प्रदेशातील पंडित छन्नूलाल मिश्र
मेरी कौम
पेजावर मठाचे श्री विश्वेशतीर्थ स्वामी (मरणोपरांत)

२०२१ साठी पद्मविभूषण

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे
गायक एसपी बालासुब्रमण्यम (मरणोपरांत)
मौलाना वहीद्दीन खान
डॉ. बेला मोन्नपा हेगडे
बीबी लाल
नरिंदर सिंह कपानी
सुदर्शन साहो

पद्म भूषण

कृष्णन नायर शांतकुमारी (कला, केरळ)
तरुण गोगोई ( मरणोपरांत)
चंद्रशेखर कंबरा (साहित्य, कर्नाटक)
सुमित्रा महाजन
नृपेंद्र मिश्र (नागरी सेवा)
रामविलास पासवान (मरणोपरांत)
केशुभाई पटेल (मरणोपरांत)
कल्बे सादिक (मरणोपरांत)
रजनीकांत देवीदास (उद्योग, महाराष्ट्र)
तरलोचन सिंह

पद्मश्री

मृदुला सिन्हा (मरणोपरांत)
पीटर ब्रुक (कला)
फादर वेल्स (मरणोपरांत)
प्रा. चमनलाल सप्रु (मरणोपरांत)
अदनान सामी (कला)
कंगना राणावत (कला)

अदनान सामीवरुन मलिकांचा केंद्रावर निशाणा

प्रसिद्ध गायक अदनाना सामी यांना पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला आहे. यावरुन राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. आमच्यासोबत असलेल्यांना आम्ही नागरिकत्व आणि पद्मश्रीही देऊ. मग तो पाकिस्तानचा असला तरी चालेल, असा घणाघात नवाब मलिक यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केला.

मनोरंजन क्षेत्रासह इतर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यात पाकिस्तानचा प्रसिद्ध गायक, संगीतकार अदनान सामी यांना पद्मक्षश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर नवाब मलिक यांनी केंद्रावर टीका केली आहे.

नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी “आमच्यासोबत असलेल्यांना आम्ही नागरिकत्व आणि पद्मश्रीही देऊ. भले तो पाकिस्तानचा असेल. पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अदनान सामीचे अभिनंदन!” असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button