नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काही थांबताना दिसत नाही आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा जीव जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ४ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. यादरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना परिस्थितीसंबंधित नवी माहिती दिली आहे. गेल्या ७ दिवसांत १८० जिल्ह्यांध्ये एका कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसल्याची दिलासादायक माहिती शनिवारी आरोग्यमंत्र्यांनी दिली.
डॉ. हर्षवर्धन यांनी पुढे सांगितले की, ‘गेल्या १४ दिवसांत १८ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्णांची नोंद झालेली नाही. शिवाय गेल्या २१ दिवसांत ५४ जिल्ह्यांत कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही.’ भारत सरकारद्वारे असे सांगण्यात आले की, त्याच्या वतीने हे निश्चित केले जात आहे की, परदेशातून आलेली आवश्यक वैद्यकीय मदत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना प्रभावीपणे वाटप केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत २ हजार ९३३ ऑक्सिजन कंसंट्रेटर, २ हजार ४२९ ऑक्सिजन सिलिंडर, १३ ऑक्सिजन उत्पादन प्लांट, २ हजार ९५१ व्हेंटिलेटर, बीआई/ पीएपी/ सी पीएफी आणि ३ लाखांहून अधिक रेमडेसिवीर वितरित करण्यात आल्या आहेत.