राजकारण

प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, तर पेशवाईला फटका : नाना पटोले

अमरावती : येत्या निवडणुकीत वंचित आघाडी आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोरोना रुग्णालयांना भेट देण्यासाठी नाना पटोले सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, नक्षलवादी हे लोकतांत्रिक पद्धतीचा विरोध करतात, त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने पटोले यांना विचारण्यात आलं, त्यावर नाना पटोले म्हणाले, संभाजीराजे छत्रपती आणि वंचित आघाडी एकत्र आले तर त्याचा फटका शिवशाहीला नव्हे तर पेशवाईला बसेल.

कोरोनानंतर उद्भवणार्‍या आजारावर केंद्र सरकारकडे इंजेक्शन उपलब्ध असतानाही ते राज्याला देत नाही. आज राज्यात ५० हजार पोस्ट कोव्हिडचे रुग्ण असताना, केवळ चार ते पाच हजार इंजेक्शन देतात. बाहेर या इंजेक्शनचा काळा बाजारा केला जातो. यामुळे अनेकांना आपले जीव तर काहींना आपले अवयव गमवावे लागले आहेत. मात्र केंद्र सरकारला सामान्य माणसाशी काहीही घेणे देणे नाही. ते सामान्य माणसाच्या जीवाशी खेळत आहेत, अशी घणाघाती टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button