Top Newsइतर

चक्रीवादळ आणि तुफानी पावसाने मुंबईला झोडपले

मुंबई : मुंबईत तुफान पाऊस सुरु असून तौत्के चक्रीवादळाचा परिणाम म्हणून समुद्राला उधाण आले आहे. उंचच उंच लाटा उसळत असून वाऱ्याचा प्रंचड वेग असल्यानं झाडे उन्मळून पडली आहेत. मुंबईत सर्व यंत्रणा सज्ज आहे, मुंबईत चक्रीवादळाचे परिणाम दिसत आहेत, अनेक भागात झाडं पडली आहेत, जीवितहानी नाही, मुंबईकरांनी गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, वरळी सीलिंक सुरक्षतेसाठी बंद ठेवला आहे, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

मुंबईचा वरळी केळीवाडा जलमय झाला आहे. समुद्राला उधाण आल्याने समुद्राचं आणि पावसाचं पाणी लोकांच्या घरात शिरलं, गुडगाभर पाणी भरल्याने नागरिक हैराण. काल रात्रीपासून मुंबईसह किनारपट्टीच्या भागात जोरदार वारेवाहत असून पावसानेही दमदार हजेरी लावली आहे. आज सकाळी मुंबईत अवघ्या दोन तासात १३२ झाडे उन्मळून पडली आहेत. त्यावरून तौक्ते वादळाचा तडाखा किती मोठा आहे हे दिसून येते. सुदैवाने झाड कोसळल्याने कोणतीही जिवीत वा वित्तहानी झाली नाही. तसेच कुणालाही मार लागला नसल्याचं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

अरबी समुद्रात तयार झालेलं तौत्के चक्रीवादळ तासागणिक अधिक सक्रिय होणार असून त्याचा वेगही वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पावसाने रविवारपासूनच हजेरी लावली आहे. तर केरळ, गोवापाठोपाठ सिंधुदुर्ग, रत्नागिरीत तौत्के चक्रीवादळाने रौदरुप धारण केले आहे. यानंतर या चक्रीवादळाचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. या चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेज अलर्ट जारी केला आहे चक्रीवादळाचा सतर्कतेचा इशारा म्हणून मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचसोबत मच्छिमारांना देखील आवाहन केले जात आहे. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असेल, त्यामुळे मुंबईतील कोळीवाड्यातील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेकडून कोळीवाड्यातील नागरिकांची राहण्याची व्यवस्था सुरक्षित स्थळी करण्यात आली आहे.

रेल्वेवर झाड कोसळलं

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलवर आज एका झाडाची फांदी कोसळली. ओव्हरहेड वायरवर ही फांदी कोसळल्याने शॉर्ट सर्किट झाल्याने लगेचच धूर निघाला. त्यामुळे लोकल तात्काळ थांबवावी लागली. परिणामी रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. या घटनेमुळे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून झाड दूर केलं. ‘मिड-डे’ या दैनिकाने त्याबाबतचं ट्विट केलं आहे.

मुंबईत एकूण पाच ठिकाणी घरे पडणे आणि भिंती खचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या घटनांमध्ये कुणालाही मार लागला नाही.

मुंबईत जोराचे वारे वाहत असून पाऊसही पडत आहे. मुंबईच्या अरबी समुद्रातून हे वादळ गुजरातच्या दिशेने जाणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वरळी-वांद्रे सी-लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सकाळी १० वाजल्यापासून हा सी-लिंक बंद करण्यात आला आहे.

दुसऱ्या महिलेचाही मृत्यू

तौक्ते चक्रीवादळचा रायगडला मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरं आणि झाडांची पडझड झाली आहे. आज सकाळी भिंत कोसळून एका भाजीविक्रेत्या महिलेचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत जखमी असलेल्या दुसऱ्या महिलेचा सुद्धा मृत्यू झाला. आज सकाळी उरणमध्ये भाजी विक्री करण्यासाठी बसलेल्या दोन महिलांच्या अंगावर भिंत कोसळली. यात नीता नाईक यांचा मृत्यू झाला होता. तर सुनंदा घरत या जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर एका प्राण्याचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

रायगडमध्ये १ हजार घरांचे अंशत: नुकसान, ८ हजार नागरिकांचं स्थलांतर

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असेलल्या तौत्के चक्रीवादळानं गती घेतल्यामुळं त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, रत्नागिरी तालुक्यातील जवळपास सगळ्या गावांना बसलाय. त्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या आतापर्यंत ७ हजार ८६६ नागरिकांचे स्थलांतरण पूर्ण झाले आहे. अलिबाग-६०५, पेण-१९३, मुरुड-१०६७, पनवेल-१८६ उरण-४५१, कर्जत-४५, खालापूर-१७६, माणगाव- १३०९, रोहा- ५२३, सुधागड-१६५, तळा- १३५, महाड-१०८०, पोलादपूर- २९५, म्हसळा- ४९६, श्रीवर्धन- ११५८ या एकूण ७, ८६६ लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. तर रविवारी तौक्ते चक्रीवादळ सध्या सिंधुदुर्गाच्या मालवण किनारपट्टीजवळ असल्याने चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन देखील सतर्कता दाखवत जिल्हा प्रशासनाने किनारपट्टीरील ६८ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं होतं.

वादळाचा साताऱ्याला फटका, अनेक घरांची पडझड

सातारा जिल्हयातील पश्चिम भागाला तौक्ते वादळी वाऱ्याचा मोठा फटका, जिल्ह्यातील प्रतापगडसह, महाबळेश्वर, पाचगणी परिसरात तौक्ते चक्रीवादळाचा फटका, महाबळेश्वर तालुक्यात २२ घरांचे, ३ शासकीय इमारतींचे अंशतः नुकसान, तसेच १८ विद्युत पोल आणि विद्युत वाहिनीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती, वाई तालुक्यात ७ घरांचे तर एका शाळेचे, १० विद्युत खांबांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

मुंबईत दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी समुद्राला भरती येणार असून समुद्र किनारी नागरिकांनी न जाण्याचं मुंबई महापालिकेनं आवाहन केलं आहे. अरबी समुद्रात उसळणार ३.९४ मीटरपर्यंत लाटा उसळतील असा अंदाज आहे.

नाशिकला फटका, झेडपी शाळेचं छप्पर उडालं

तौक्ते चक्रीवादळाचा नाशिक जिल्ह्यातील हरसूल तालुक्याला फटका, सकाळी आलेल्या वादळाने जिल्हापरिषदेच्या शाळेचे छप्पर उडाले, जिल्हा परिषदेच्या सांबरखल शाळेचं मोठं नुकसान, राज्यपालांनी दौरा केलेल्या गुलाबी गावातही मोठं नुकसान झालं.

मुंबईसह ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट

मुंबईत आज ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईजवळच्या समुद्रातून जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र जाणवत असला तरी बऱ्याच ठिकाणचा धोका टळला आहे. मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबई आणि उपनगरात गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या काही काळात मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे १५० मी अंतरावर आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबईत सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू असून पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

येत्या ३ तासात धुळे, अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यातील काही भागात ४० ते ५० किमी प्रतितास वेगाच्या जोरदार वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई ते ठाणे रायगड, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील वेगळ्या भागात वाऱ्यासह ७५-८० किमी प्रतितास पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई हवामान खात्याने वर्तवला आहे.

सिंधुदुर्गात दोन बोटी वाहून गेल्या; एका खलाशाचा मृत्यू तर तिघे बेपत्ता

चक्रीवादळाचा तडाखा सिंधुदुर्गाला बसला असून देवगड तालुक्यातील आनंदवाडी बंदर येथे नांगरुन ठेवलेल्या दोन बोटी वाहून गेल्याने बुडाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये एका खलाशाचा मृत्यू झाला तर तिन जण बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरु आहे. याविषयी देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार काल दुपारी ३.३० वा. सुमारास आंनदवाडी बंदर येथे नांगरून ठेवलेल्या रघुनाथ यशवंत कोयंडे यांच्या रुक्मिणी या बोटी वाहून गेल्यात.

या दुर्घटनेमध्ये राजाराम कृष्णा कदम ( रा. गढीताम्हणे, ता. देवगड ) या खलाशाचा मृत्यू झाला आहे. तर दिनानाथ जोशी (रा. पावस, रत्नागिरी), नंदकुमार नार्वेकर (रा. कोल्हापूर), प्रकाश गिरीद (रा. राजापूर, रत्नागिर) हे बेपत्ता आहेत. तर जानू यशवंत डोर्लेकर (रा .रत्नागिरी), विलास सुरेश राघव (रा. पुरळ – कळंबई, ता. देवगड), सूर्यकांत सायाजी सावंत (रा. हुंबरठ, ता. कणकवली) हे सुखरुप बाहेर आले आहेत.

दरम्यान, रुक्मिणी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी, निरज यशवंत कोयंडे यांची, आरची नावाची दुसरी बोट रुक्मिणी बोटी जवळ नेण्यात येत होती. पण, वादळी वाऱ्यामुळे आरची बोटीवरील %

Related Articles

Back to top button