मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणा-या बारावीच्या निकालाची मोठी उत्सुकता विद्यार्थ्यांसह पालकांना लागली होती. ३१ जुलैपर्यंत हा निकाल जाहीर होणार असं सांगण्यात येत होत. मात्र, आता ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता हा निकाल जाहीर होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.
बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे राज्य मंडळातर्फे अंतर्गत मुल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर केला जात आहे. राज्य मंडळाच्या सूचनेनुसार शाळांनी संगणकीय प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांचे गुण जमा केले आहेत. आता विभागीय मंडळाकडून प्राप्त गुणांचे संकलन राज्य मंडळकडून केले जात आहे. मंडळाकडून ३१ जुलै रोजी निकाल जाहीर केला जाईल, अशी विद्यार्थी व पालकांना अपेक्षा होती. परंतु, निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात बारावीचा निकालांबाबत अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, आता निकालाची तारीख निश्चित झाली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये मंडळाच्या कार्यपद्धती नुसार तयार करण्यात आलेला इ.१२ वीचा निकाल दि.०३ ऑगस्ट,२०२१ रोजी दु.४:०० वा. ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे, स्वत: शिक्षणमंत्र्यांनी ट्विट करुन याची घोषणा केली आहे.
निकाल कुठे पाहाल?
mahahsscboard.in
https://msbshse.co.in
https://hscresult.11thadmission.org.in
http://hscresult.mkcl.org
http://mahresult.nic.in
www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
निकाल कसा पाहाल ?
– निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.
– त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.
– त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.
– त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.
– यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल
– निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.
बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील गुणांना सर्वाधिक वेटेज
बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला बसलेले खासगी विद्यार्थी, पुन्हा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्यासाठी वेगळा फॉर्म्युला जाहीर करण्यात आला आहे. त्यासंबंधी अधिक माहिती शासन निर्णयात पाहायला मिळेल.
असे मिळणार गुण
२०२१ मध्ये आयोजित करण्यात आलेली १२ वीची परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आली होती. त्यामुळे मूल्यमापन कार्यपध्दती व तरतूदीनुसार व १० वीमध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांचे सरासरी गुण, ११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण व १२ वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषयनिहाय प्राप्त गुण तसेच १२ वी चे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत व तत्सम मूल्यमापनातील प्राप्त गुण इत्यादींच्या आधारे १२ वी साठी भारांशानुसार उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. सदर गुणदान विचारात घेवून मंडळाने विहित कार्यपध्दतीनुसार सदर परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केलेली आहे.
२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार सन २०२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस श्रेणीसुधार योजनेतंर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. सदर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नाही. त्यामुळे सदर विद्यार्थ्यांना पुढील एक /दोन संधी उपलब्ध राहतील.