परवानगी नसताना नागरिकांना फ्रान्समधील मॉडर्नाची लस कशी दिली जाते?
केंद्र सरकारने खुलासा करण्याची नवाब मलिक यांची मागणी
मुंबई : देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना नागरिकांना फ्रान्समधील मॉडर्नाची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्र सरकारने करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
देशात लस तुटवडा असल्याचे केंद्र सरकार सांगतेय. केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिटयूट व स्पुटनिक लसीला परवानगी दिली आहे. असे असताना या देशात आणि मुंबईच्या आजुबाजुला मॉडर्नाचे लसीकरण सुरू आहे अशी माहिती उपलब्ध झाल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
हे लसीकरण विदेशातील दुतावास करत आहेत. विशेषतः फ्रान्स या देशातील नागरिक भारतात व मुंबईत आहेत. त्यांना मॉडर्नाची लस देण्यासाठी काही हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू करण्यात आले आहे. दुतावासातील भारतीय नातेवाईकांनाही लसीकरण करण्यात येत आहे असेही नवाब मलिक म्हणाले.