ठराविक पक्ष आणि नेत्यांवरच ईडीची कारवाई कशी? : सुभाष देसाई
अहमदनगर : ईडीची कारवाई ठराविक पक्ष आणि नेत्यांवरच कशी होते?, अशी शंका उपस्थित करत या सगळ्याविरोधात लढायला आम्ही समर्थ आहोत अशा शब्दांत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केंद्र सरकार आणि भाजपविरोधात त्यांनी दंड थोपटले आहेत.
देशात आणि महाराष्ट्रात कसं आणि कोणतं राजकारण चाललंय, हे सध्या सर्वांना माहिती आहे. नेमक्या ठराविक लोकांवर आणि पक्षांवर ईडी कशी काय कारवाई होते, असा सवाल सुभाष देसाई यांनी उपस्थित केलाय. यांचं राजकारण आता सर्वाना कळलंय असून अशा प्रकारच्या कारवायांना महाविकास आघाडीचे नेते तोंड द्यायला समर्थ आहेत, असं म्हणत त्यांनी भाजपविरोधात दंड थोपटले.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बैठक घेतलीये. राज्य सरकार अत्यंत गंभीर असून दोन्ही समाजाला न्याय मिळण्यासाठी राज्य सरकार आपल्या जबाबदारीतील कामे करायला तयार आहेय. मात्र केंद्राने देखील जबाबदारी घेतली पाहिजे म्हणजे दोन्ही समाजाला न्याय मिळेल असंही ते म्हणाले.