राजकारण

८ शिवसैनिकांना अटक होणार, किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांना शनिवार ५ फेब्रुवारी रोजी पुण्यात शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली होती. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी धक्काबुक्की करणार्‍या शिवसैनिकांविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली असून शिवसेनेच्या ८ कार्यकर्त्यांना अटक होणार असल्याचा दावा केला.

किरीट सोमय्या यांनी पुणे महानगरपालिका परिसरात शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर ट्वीट करत पुण्याचे शिवसेना शहराध्यक्ष संजय मोरेंसह ८ शिवसेना नेत्यांना अटक होणार असल्याचा दावा केला आहे. आपल्या या ट्वीटमध्ये किरीट सोमय्या यांनी शिवसैनिकांवर दाखल गुन्ह्यातील कोणती कलमे लावण्यात आली याचीही माहिती दिली आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत. एफआयआर क्रमांक ००१२ आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्वीटमध्ये एफआयआरची कॉपी देखील पोस्ट केली आहे. यात शिवसेनेच्या ८ स्थानिक नेत्यांच्या नावांचाही उल्लेख आहे.

किरीट सोमय्या शनिवारी आधी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्वीकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारले नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button