राजकारण

यंदा प्लॅस्टिक तिरंगा वापरल्यास कारवाई होणार; गृह मंत्रालयाचे राज्यांना आदेश

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. तिरंगा जर फाटला किंवा जीर्ण झाला किंवा अन्य काही घडले तर तो नष्ट करण्याची एक सरकारी पद्धत आहे. परंतु प्लॅस्टिकचे तिरंगे तो दिवस संपला किंवा कार्यक्रम संपला की रस्त्यात कुठेही फेकलेले असतात. त्याची विटंबना होते, अपमान होतो. यामुळे यंदा केंद्रीय गृह मंत्रालयाने थेट राज्यांनाच सतर्क राहण्याचे आदेश काढले आहेत.

लोकांनी प्लॅस्टिकचे झेंडे वापरू नयेत, यासाठी कारवाई करावी असे आदेश राज्यांना देण्यात आले आहेत. यासाठी राज्यांना आठवडाभर आधीच पत्र पाठविण्यात आले आहे. राष्ट्रीय ध्वजाचा अपमान न होण्यासाठी प्लॅस्टीकच्या ध्वजांची विक्री राज्य सराकारांना आता थांबवावी लागणार आहे. आपला राष्ट्रीय ध्वज सर्वांच्या हृदयात स्नेह, सन्मान आणि निष्ठा जागवतो. आस्थेचा विषय आहे. मात्र, तरी देखील लोकांबरोबरच सरकारी कार्यालयांतही याबाबत जागरुकता नसते. यामुळे राष्ट्रीय, सांस्कृतीक आणि खेळांच्या आयोजनाच्या ठिकाणी सर्रास प्लॅस्टीक ध्वज वापरला जातो. ते विघटनशील नसल्याने खूप काळ तसेच पडून राहतात, हे टाळा, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

यामुळे राज्यांना आदेश देण्यात येत आहे की, जनतेकडून कागदी झेंड्यांचा वापर केला जावा. यासाठी योग्य ती कार्यवाही करावी. भारतीय ध्वज संहिता २००२ नुसार त्याचा वापर करावा. कार्यक्रम झाल्यावर हे झेंडे जमिनीवर फेकण्यात येऊ नयेत असेही म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button