फोकस

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : अनेक ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढच्या पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अतिमुसळधार पावसाची शक्यता होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर राज्य सरकारकडून स्थानिक प्रशासनाला दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

पुढील पाच दिवसांत देशाच्या विविध राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यादृष्टीने स्थानिक प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. नैऋत्येकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे पाऊस पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने पुढे सरकण्याची अधिक शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

अनेक राज्यांमध्ये १ जुलैपर्यंत अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. यात किनारपट्टी लगतच्या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पावसाबरोबरच बर्फवृष्टीही होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button