मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २०२१ या वर्षातील जवळपास सर्वच सण अगदी साधेपणानं साजरे करण्यात आले. आता अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळावर देखील ओमायक्रॉनचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत. शिवाय नाताळ सण साजरा करण्यासाठीही ठराविक नियमांचं सर्वांना पालन करावं लागणार आहे. नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचं पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत कोरोना नियंत्रणात ठेवण्याच्या या युद्धात हातभार लावावा असंच जाहीर आवाहन करण्यात येत आहे.
यंदाचा नाताळ साजरा करण्यासाठीचे नियम खालीलप्रमाणं…
– ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा
– स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये ५० % लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी जास्त जणांचा समावेश नसावा.
– कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी.
– सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य
– चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक
– चर्चमध्ये प्रभू येशुचं स्तुतीगीत गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश करावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा
– चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नये
– कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणूकीचे आयोजन करु नये.
– फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये