मोफत लसीकरणाचा निर्णय टक्केवारीसाठी मागे घेऊ नका; पडळकरांनी आदित्य ठाकरेंना डिवचले
मुंबई : मोफत लसीकरणावरून ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्येच एक वाक्यता असल्याचं दिसत नाही. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाबाबतचं ट्विट डिलीट केल्याने हा गोंधळ अधिकच समोर आला आहे. आघाडीतील या गोंधळावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे.
पडळकर यांनी ट्विट करून हा निशाणा साधला आहे. बिघाडी सरकारचे लाडके मंत्री आदित्य ठाकरे यांचे ट्विट वाचून आनंद झाला. पण तो काही क्षणातच विरला. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगणारे तुम्ही आहात, ‘वाटाघाटीʼ आणि ‘टक्केवारीमुळेʼ लोकहितासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी जाहीर केलेला मोफत लसीकरणाचा निर्णय वापस घेऊ नये, हीच अपेक्षा, असा टोला पडळकर यांनी लगावला आहे. राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मोफत लसीकरण करण्याचं ट्विट केलं. ते ऐकून खूप आनंद झाला. पण काही वेळातच त्यांनी ट्विट डिलीट केलं. महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा निर्णय त्यांनी मागे घेऊ नये, असंही ते म्हणाले.