राजकारण

सेक्स स्कँडल प्रकरणात गोव्यातील भाजप मंत्र्याचा राजीनामा

पणजी : गोव्यातील सत्ताधारी भाजप सरकारमधील नगरविकास मंत्री मिलिंद नाईक यांनी राजीनामा दिला आहे. एका महिलेशी संबंधित प्रकरणावरुन करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे अखेर मिलिंद नाईक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. त्याचा राजीनामा मुख्यमंत्री प्रमोद सावंत स्वीकारल्याचं कळतंय. गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मिलिंद नाईक यांच्या नावाचा गौप्यस्फोट केल्यानंतर मिलिंद नाईक यांनी मंत्रिपद सोडलंय.

सेक्स स्कँडलमध्ये गोवा मंत्रिमंडळातील मंत्री मिलिंद नाईक असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याकडून उघड करण्यात आलं होतं. कथित आरोपाचा व्हिडिओ वा ऑडिओ नाही. मात्र त्यांनी महिलेवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठविला होता. दिलेल्या मुदतीत सरकार कारवाई करण्यास अपयशी ठरल्याने हे नाव उघड केल्याचे चोडणकरांनी सांगितले म्हटलं होतं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने एका महिलेवर अत्याचार केल्याचा गौप्यस्फोट करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. तत्पूर्वी गिरीश यांनी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेऊन त्या मंत्र्याचे नाव राज्यपालांना सांगितले आहे.

मुरगावचे भाजप आमदार मिलिंद नाईक हे बिहारमधील एका महिलेचे लैंगिक शोषण झालेल्या कथित सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितलंय की, नाईक यांचा सहभाग सिद्ध करणारा व्हिडिओ त्यांनी स्वतः पाहिला होता. दोन दिवसांपूर्वी चोडणकर यांनी राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांची भेट घेतली होती. तसेच या स्कँडलमधील त्यांच्या कथित सहभागामुळे नाईक यांना भाजपच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी मागणी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button