निकलोडियनच्या टुगेदर फॉर गुडची नवीनतम आवृत्ती “गिव्ह मोअर, ग्रो मोअर”

नवी दिल्ली : कोविड साथीने आपल्याला आयुष्याची दुसरी बाजू आणि देशातील विषमता कधी नव्हे एवढी प्रकर्षाने दाखवली असली, तरी याच साथीमुळे आपल्याला लवचिकता व माणुसकीचे महत्त्वही जाणवून दिले आहे. लहान मुलांना वाटून घेणे अर्थात शेअरिंग शिकवण्यासाठी या काळाने दिलेल्या उत्तम संधीचा उपयोग करत, निकलोडियनने “टुगेदर फॉर गुड” या आपल्या जागतिक प्रो-सोशिओ (समाजप्रधान) अभियानाच्या भारतातील आवृत्तीसह पुनरागमन केले आहे. लहान मुलांच्या मनोरंजन विश्वातील आद्य तसेच आघाडीची वाहिनी निकलोडियन यंदा गूंज या स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगाने लहान मुलांना, गरजूंसोबत आपल्या वस्तू वाटून घेण्याची तसेच आनंद पसरवण्याची, प्रेरणा देत आहे. यासाठी “गिव्ह मोअर अँड ग्रो मोअर” हा संदेश दिला जात आहे.”
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सृजनशील शैलीमधील या अभियानामध्ये निकटून्स दोन आकर्षक, मजेशीर व हलक्याफुलक्या ऑन-एअर फिल्म्सच्या माध्यमातून करुणेची जोपासना करण्याचा संदेश देत आहेत. शेअरिंग आणि अधिक काही देण्याच्या शिकवणीमुळे आपण दुसऱ्यांच्या आयुष्यात कसा बदल घडवून आणू शकतो हे या फिल्म्स सांगत आहेत. लिंक- https://www.nickindia.com/together-for-good/.
व्हायकॉम१८च्या हिंदी मास एंटरटेन्मेंट आणि किड्स टीव्ही नेटवर्क विभागाच्या प्रमुख निना एलाव्हिया जयपुरिया या उपक्रमाबद्दल म्हणाल्या, “लहान मुलांसाठीचे जबाबदार प्रसारणकर्ता म्हणून त्यांचे स्वास्थ्य व वाढ ही निकलोडियनच्या प्रत्येक उपक्रमाच्या केंद्रस्थानी असते. गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये सकारात्मक वर्तनात्मक बदलांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही ‘टुगेदर फॉर गुड’ या विषयवस्तूखाली अनेक सामाजिक उपक्रम आणले आहेत. लहान मुले हे समाजातील परिवर्तनाचे दूत आहेत आणि त्यांना शेअरिंगचे महत्त्व पटवून देणे हे त्यांच्यामध्ये सहानुभूतीची जाणीव व उच्च भावनांक रुजवण्याकडे टाकलेले मोठे पाऊल आहे, यावर आमचा विश्वास आहे. ”
अभियानाचा एक भाग म्हणून निकलोडियन लहान मुलांमध्ये गिव्ह मोअर अँड ग्रो मोअर हा संदेश अधिकाधिक प्रमाणात पोहोचण्यासाठी अनेक सृजनशील पद्धतींचा वापर करणार आहे. या अत्यंत आकर्षक डिजिटल अभियानाचे प्रमोशन यूट्यूबसारख्या मोठी व्याप्ती असलेल्या प्लॅटफॉर्मद्वारे केले जाईल आणि पुढे त्याला फेसबुक व इन्स्टाग्रामवरील सोशल मीडिया योजनेचे पाठबळ दिले जाईल. याशिवाय हे अभियान मॉमी नेटवर्क्स तसेच शहरातील प्रभावी व्यक्तींच्या सहभागातून आणखी जिवंत केले जाईल. यामुळे अभियानाची व्याप्ती अनेक पटींनी वाढेल आणि संदेश सर्वदूर पोहोचेल.
टुगेदर फॉर गुड हा निकलोडियनचा जागतिक स्तरावरील उपक्रम आहे. कोणीही, कोठूनही, कधीही जगाला अधिक चांगले करण्यासाठी मदत करू शकते यावर या उपक्रमाचा विश्वास आहे. या अभियानाच्या यापूर्वीच्या आवृत्त्यांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. लहान मुलांवरील शिक्षणाचा ताण, लहान मुलांची सुरक्षितता, बाल लैंगिक छळ आणि अशा अनेक विषयांवर या उपक्रमाद्वारे भाष्य करण्यात आले आहे. ही आवृत्तीही पुन्हा एकदा सामुदायिक भावना व काळजी घेण्याची वृत्ती जोपासण्याच्या दिशेने एक पाऊल टाकत आहे. या दोन्ही बाबी सध्याच्या जागतिक आरोग्य संकटातून बाहेर येताना राष्ट्रांसाठी आवश्यक आहेत.