राजकारण

‘ईडी’चे समन्स आले की खडसेंना कोरोना होतो; गिरिश महाजनांचा खोचक टोला

जळगाव : “ईडीकडून चौकशीचे समन्स आले की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना कोरोना होतो,” असा खोचक टोला भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी खडसेंवर जोरदार प्रहार केले.

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर कधी लपून राहिलेले नाही. वेळ मिळेल तेव्हा हे दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसतात. भाजपमध्ये झालेल्या कोंडीमुळे खडसे यांनी पक्षांतर केल्यामुळे तर गिरीश महाजन त्यांच्यावर उघडपणे शाब्दिक प्रहार करताना दिसतात. यावेळीदेखील महाजन यांनी खडसेंना घेरण्याची संधी सोडली नाही. मागील काही दिवासांपासून खडसेंच्या मागे ईडीचे शुक्लकाष्ठ लागलेले आहे. तसेच आतापर्यंत खडसे यांना तीन वेळा कोरोनाची आणि कोरोनासदृश्य लक्षणे दिसून आली आहेत. या दोन्ही गोष्टींचा संदर्भ घेऊन महाजन यांनी खडसेंना घेरलंय. जेव्हा जेव्हा ईडीकडून चौकशीची तारीख येते, तेव्हा तेव्हा खडसे यांना कोरोनाची लागण होते; असं म्हणत महाजन यांनी खडसेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

ज्यात कोरोना महामारीचा संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. खडसेंनासुद्धा आतापर्यंत तीन वेळा कोरोना आणि कोरोनासदृश लक्षणे दिसून आली आहेत. त्यांची सर्वांत अधी 19 नोव्हेंबर 2020 रोजी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. ट्विटरवर त्यांनी तशी माहिती दिली होती. त्यानंतर 31 डिसेंबर रोजी पुन्हा त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्याने डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. त्यानंतर पुन्हा फेब्रुवारी महिन्यात त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button