राजकारण

भाजपकडून गांधी जयंती म्हणजे ‘मुंहमें गांधी बगलमें गोडसे’ : सचिन सावंत

मुंबई : भाजपने २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमादरम्यान भाजप महात्मा गांधींजींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणार आहे. यावर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. गांधी हत्येनंतर मिठाया वाटणारे म्हणे गांधींचा विचार पोहोचवणार अशी टीका भाजपवर करण्यात आली आहे. गांधीचा मुखवटा घालून गांधींचा विचार संपवण्याचा संघाच्या षडयंत्राचा हा भाग असल्याचे सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तसेच गांधींचा विचार पसरवण्याचा कार्यक्रम म्हणजे ‘मुंहमें गांधी बगलमें गोडसे’ असा हा प्रकार असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपच्या कार्यक्रमांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सचिन सावंत यांनी म्हटलं आहे की, गांधी हत्येनंतर मिठाया वाटणारे म्हणे गांधींचा विचार पोहोचवणार. मुंहमें गांधी बगलमें गोडसे! हेडगेवार जेलमध्ये जाऊन संघविचाराचाच प्रसार करत होते तोच हा प्रकार! गांधीचा मुखवटा घालून गांधींचा विचार संपवण्याच्या संघाच्या षडयंत्राचा हा भाग आहे. गोडसे स्वयंसेवक होता हे देश विसरणार नाही. गांधीचे नाव केवळ स्वच्छतेशी न जोडता मनातील द्वेष, तिरस्कार संपवा. गांधींनी मनाची स्वच्छता ही महत्त्वाची मानली होती म्हणून ते देश स्वतंत्र होत असताना नौखालीत होते. गोळवलकर, उपाध्याय यांच्या लिखाणाचे दहन करा. गोरी मारो सालोंको म्हणणाऱ्यांना व लिंचिंग करणाऱ्यांचा सत्कार करणाऱ्यांना पक्षातून काढा. दंगेखोरांना शासन करा, असं सचिन सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

गांधी हत्या ही संविधानाची निर्मिती होत होती म्हणून झाली. त्या संविधानाला विरोध करणारे मनुस्मृती चे समर्थक कोण होते हे देश जाणतो. पाच का पचीस आणि दिमक म्हणणाऱ्यांचा पक्ष तोंडाने महात्मा बोलेल पण वर्षानुवर्षे त्यांना दुष्टात्माच ठरवत आलेला आहे. अशा शब्दात सचिन सावंत यांनी भाजपच्या कार्यक्रमांचा समाचार घेतला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button