1) नाना पटोलेंना समजावणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता – चंद्रशेखर बावनकुळे
– हेच गाढव बराच काळ तुमच्या कळपात होतं म्हणे ?
2) मोदी आणि व्हेंटिलेटर सारखेच – राहुल गांधी
– मग बनवा की त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष , निदान जीव तरी वाचेल !
3) गोमूत्र प्यायल्यामुळे मला कोरोना झाला नाही – स्वाध्वी प्रज्ञासिंग
– एकदा शेण खाऊन पाहायला काय हरकत आहे , कदाचित अमरत्वही प्राप्त होईल.
4) खतांची दरवाढ मागे घ्या -शरद पवारांचे केंद्राला पत्र
– बारवाल्यांकडून एकदम शेतकऱ्यांकडे ? सो चुहे खाके – – –
5) पदोन्नती आरक्षणावरून कॅबिनेटमध्ये खडाजंगी,अजित पवार नितीन राऊत भिडले – एक बातमी.
– लंगडं कुबडीशी भांडणार तरी किती ?
6) गडकरींनी सांगूनही फडणवीसांची राजकारण करण्याची हौस काही फिटत नाही -रोहित पवार
– शरद पवारांनी सांगूनही पार्थ पवारांची निवडणुकीला उभं राहण्याची हौस तरी कुठे फिटली होती ? इतक्या लवकर विसरले ?
7) लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे अनैतिकता म्हणून न्यायालयाचा विरोध – एक बातमी
– बापरे ! महाआघाडीबद्दलही न्यायालय असंच काही म्हणेल का ?
8) मोदी गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागतात – पृथ्वीराज चव्हाण
– आणि उध्दव ठाकरे तर मुंबईचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागतात !
9) मोदींच्या बैठकीत मुख्यमंत्री केवळ ‘कठपुतली’ – ममता बॅनर्जी
– समोर ‘ बोलका बाहुला’ असल्यानंतर दुसरे काय होणार ?
10) चारवेळा पत्र लिहूनही पंतप्रधानांनी भेटीची वेळ दिली नाही – संभाजीराजे भोसले
– इतिहासातील राजाचे वंशज असणे आणि वर्तमानात राजा असणे याच्यात हाच तर फरक असतो राजे !
11) पंतप्रधान मोदी दिलदार आहेत, महाराष्ट्राला १५०० कोटी देतील – संजय राऊतांची सामनाच्या अग्रलेखातून टीका
– तुम्ही समजता त्याच्यापेक्षा ते कितीतरी जास्त दिलदार आहेत. तुम्ही मागाल तर ते तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून फडणवीसही देतील, मागून तर पहा !
13) फडणवीस वकील असल्याने कसे बोलावे हे त्यांना बरोबर कळते – नबाब मलिक
– आणि तुम्हाला तर धड शुद्ध मराठीसुद्धा बोलता येत नाही.
14) मी विरोधी पक्षनेत्याप्रमाणे वैफल्यग्रस्त नाही – उध्दव ठाकरे
– असूच शकत नाही. त्यांचा ‘ कोरडा दुष्काळ’ आहे , तुमचा ‘ ओला दुष्काळ’ आहे.
15) ‘ जेथे रुग्ण तेथे उपचार’ -मोदींचा नवा मंत्र
– आधीचा मंत्र ‘ जेथे उपचार तेथेच मृत्यू’ होता !
16) देशात फक्त महाराष्ट्र, पश्चिम बंगालचेच राज्यपाल काम करतात – संजय राऊतांची खोचक टीका
– ज्या शरीरात रोग असतो , त्या शरीरातच तर काम करणारे औषध टोचले जाते.
17) तरुण तेजपाल सुटले – एक बातमी
– फक्त आसारामचेच नशीब मात्र फुटले !
18) विरोधी पक्ष म्हणजे जणू ‘ ब्लॅक फंगस’ – संजय राऊत
– बापरे ! या ‘ब्लॅक फंगस’सोबत तुम्ही पंचवीस वर्षे घालवलीत !
19) नामनियुक्त बारा आमदारांचे शिफारसपत्रच राज्यपाल भवनातून गायब – एक बातमी
– यात आश्चर्य कसले? ते तर अख्ख सरकारच गायब करायच्या तयारीत आहेत.
20) राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजे ‘ सो चुहे खाकर बिल्ली हज को चली.’ – चंद्रकांत पाटील
– हीच ‘ बिल्ली’ पहाटे पहाटे तुमच्या घरात आली होती तेव्हा काय ती पंचामृत खाऊन आली होती का ?
21) पंतप्रधानांच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी झाली – नाना पटोले
– राहुल गांधींच्या बावळटपणामुळे तुमच्या पक्षाचं काय झालं तेही एकदा सांगा ना !
22) दिल्लीचे नाव इंद्रप्रस्थ करा – सुब्रमण्यम स्वामी
– दिल्लीचं नंतर पाहू ,आधी तुमचं नाव नारदमुनी करून टाका.