मुक्तपीठ

चौकार षटकार

- मुकुंद परदेशी

1) उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण कशासाठी होते तेच कळले नाही – देवेंद्र फडणवीस
# काल रश्मी वहिनींंच्या चौकशीसाठी फोन केला होता तेव्हा विचारून घेतले असते ना ?

2) खेळाडू वारंवार पंचावर शंका घेतो, तेव्हा त्याच्या खेळातच दोष असतो – (ममता दीदींना उद्देशून) नरेंद्र मोदी
# कधी कधी पंच प्रतिस्पर्धी खेळाडूला वश झालेलाही असू शकतो आणि समोर तुम्ही असलात की विषयच संपला !

3) मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत -प्रवीण दरेकर
# त्यांचं कुटुंब बहुदा त्यांचं ‘ फेसबुक लाईव्ह’ पाहत नसावं.

4) नरेंद्र मोदी आणि अमित शहा फडणवीसांना गांभीर्याने घेत नाहीत – नाना पटोले
# घर सोडून पळालेल्याने मागच्यांची उठाठेव करू नये.

5) ज्या पद्धतीने उध्दव ठाकरे महाराष्ट्र सांभाळत आहेत – – – त्यास सलाम ! सलाम !! सलाम !!! – जितेंद्र आव्हाड
# बांधा की मग हातावर शिवबंधन , वाट कसली पाहतायं ? नाहीतर अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच शिवसेनेत विलीन करून टाका !

6) महाविकास आघाडी सरकार 25 वर्षे चालणार – हसन मुश्रीफ
# मुश्रीफ साहेब, एक वर्ष म्हणजे 52 आठवडे होतात ,52 तास नाही !

7) चंद्रकांत पाटील म्हणजे भित्रा माणूस – हसन मुश्रीफ
# आपलं गाव सोडून बाहेरच्या मतदारसंघातून निवडून येणारे चंद्रकांत पाटील जर भित्रे असतील तर निवडणुकीला सामोरेच न जाणाऱ्या उद्धव ठाकरेंना काय म्हणाल ?

8) राज्यपालांनी आमच्या बारा आमदारांच एक वर्ष खाऊन टाकलं – संजय राऊत ( राज्यपाल नियुक्त बारा आमदारांबद्दल)
# याला म्हणतात ‘कुछ खोया कुछ पाया.’ बरं का राऊत साहेब . एकदाही साधे ग्रामपंचायत सदस्य ही नसलेले तुमचे मधले धनी दीड वर्षांपासून मुख्यमंत्री आहेत ना ? त्याची काहीतरी तर किंमत चुकवावी लागेल ना ?

9) एका पायावर बंगाल जिंकेन, दोन पायांवर दिल्ली – ममता बॅनर्जी
# अच्छा, म्हणजे डोक्याचं कामच नाही !

10) गृहखात्यात राजकिय हस्तक्षेप नसेल – नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
# सब कुछ लुटा के होश में आये तो क्या किया ?

11) अनिल देशमुखांसाठी सरकार सर्वोच्च न्यायालयात – एक बातमी
# ‘चोर चोर मौसेरे भाई !’ एकमेकांची पाठराखण तर करावीच लागेल ना ?

12) मुलांना अटकाव करण्याऐवजी त्यांना उत्तेजन द्या – पंतप्रधान
# आमचा एक मित्र तद्दन कफल्लक आहे, पण पैसे कसे संभाळावेत , कुठे गुंतवावे याचं तो मोफत मार्गदर्शन करीत असतो !

13) निर्बंध व्यापाऱ्यांसाठी नाही तर कोरोना रोखण्यासाठी – मुख्यमंत्री
# अगदी बरोबर ! घरात डास जास्त झाले म्हणून घर जाळलंच पाहिजे !

14) कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीचीच नाहीत. माणसाचे जगणे मरणे हे त्याच्या कर्मावर अवलंबून असते, त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याचे कारणच येत नाही – संभाजी भिडे
# बुद्धीचा साठा संपला, तरी परमेश्वर माणसांना जन्माला घालतच असतो, याचं हे भिडे म्हणजे उत्तम उदाहरण आहे .

15) कोरोनाचं राजकारण करणाऱ्या स्थानिक नेत्यांना समज द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी
# आपला वर्ग सांभाळता येत नाही म्हणून हेडमास्तरकडे रडत जाणारे गुर्जी असेच असतील का ?

16) केंद्र सरकारसुद्धा राज्याला कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करत आहे – शरद पवार
# पहा , अहमदाबादची भेट बोलते आहे !

17) लसीची दुसरी मात्रा उशिरा घेतली तरी गंभीर दुष्परिणाम नाही – राज्य कोरोना कृतीदलाचे सदस्य डॉ. तुपे
# हे का तुम्ही सांगायला हवं का ? घेतल्यावरही काही परिणाम होत नाही, तिथे उशिरा घेतल्यावर काय दुष्परिणाम होणार ?

18) राज्य सरकार आणि अनिल देशमुखांच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या -एक बातमी
# यात आश्चर्य ते काय ? बलात्काऱ्यांना मारोती कधी पावेल का ?

19) राजकीय नेत्यांना त्यांच्या घरी करोनाचे लस मिळते तरी कशी – उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
# अख्खा महाराष्ट्र या राजकारण्यांच्या तिर्थरूपांच्या नावावर आहे याची उच्च न्यायालयाला कल्पना नसावी !

20) कुटुंब सांभाळू शकत नाही ती व्यक्ती महाराष्ट्र कसा सांभाळणार – नारायण राणे
# हाच प्रश्न पंतप्रधानांनाही विचारला जाऊ शकतो का ?

21) सत्तेतील मराठी मंत्री दिल्लीत बसून महाराष्ट्राची बदनामी करीत आहेत – संजय राऊत
# राऊत साहेब , सत्तेपुढे कोणी मराठी नाही आणि कोणी गुजराती नाही. ‘जलेबी न फाफडा’ कशासाठी होते ?

22) सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोना -एक बातमी
# सर्वात आधी संभाजी भिडेंचा सल्ला घ्यायला हवा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button