फोकसराजकारण

अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात चार जणांना अटक

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात आणखी एक मोठी करण्यात आलीय. आग प्रकरणी संशय असलेल्या चार जणांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे. यामध्ये एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांचा समावेश आहे. पोलीस उपअधीक्षक संदपी मिटके यांनी ही कारवाई केलीय. याआधी राज्य सरकारने तीन अधिकारी आणि एका स्टाफ नर्सला निलंबित केले होते. तर दोन स्टाफ नर्सच्या सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यात आला होता.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात ७ नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या भीषण आगीत एकून अकरा रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. तसेच या प्रकरणाची पोलिसांकडून स्वतंत्ररित्या चौकशी करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले होते. आता पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार जणांना अटक केली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी विशाखा शिंदे, सपना पठारे यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलंय. तर आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांची सेवा समाप्त करण्यात आलीय.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये एकूण ११ जणांचा होरपूळून मृत्यू झाला होता. तर काही रुग्ण जखमी झाले होते. आग लागल्यानंतर घटनेची माहिती मिळताच अग्नशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. त्यानंतर वायुवेगाने आग विझविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. याच वेळेत बाकीच्या २० जणांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र ११ रुग्णांचा गुदमरून तसेच होरपळून मृत्यू झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button