भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच कॅबिनेट मंत्री बनवले : सूर्यप्रताप सिंह

नवी दिल्ली: मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदी सरकारने काही नेत्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांना डच्चू दिला. डच्चू दिलेल्या १२ मंत्र्यांमध्ये अनेक दिग्गज नावांचा समावेश आहे. मोदी सरकारने कामगिरीच्या आधारावर नवीन मंत्रिमंडळ गठीत केल्याची चर्चा आहे. मात्र, यावरून अजूनही टीका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले, अशी टीका माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी मोदी सरकारवर केली आहे.
माजी आयएएस अधिकारी सूर्यप्रताप सिंह यांनी एक ट्विट करत मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर टीका केली आहे. यामध्ये भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्यांनाच आता मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचे सूर्यप्रताप सिंह यांनी म्हटले आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेकांनी विविध स्तरांतून टीका केली आहे. तर, काही दिग्गज मंत्र्यांचे घेतलेले राजीनामे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले.
https://twitter.com/suryapsingh_IAS/status/1413709288091000835
ज्या नारायण राणेंवर भाजपने काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर प्रकरणात सामील असल्याचा आरोप केला होता. तेच आता केंद्रीय कॅबिनेटमध्ये आहेत आणि एमएसएमई सारख्या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवली आहे. मास्टरस्ट्रोक, असे ट्विट सूर्यप्रताप सिंह यांनी केले आहे.