Top Newsराजकारण

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंना न भेटणारे मोदी कोणत्या प्रश्नांसाठी कंगना, प्रियांकाला भेटले?; काँग्रेसचा सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ४ वेळा पत्रव्यवहार केला परंतु मोदींनी भेटीची वेळ दिली नाही. यावर संभाजीराजेंनी सोमवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोदींची बाजू घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पलटवार केला आहे. मराठा आरक्षण प्रश्नांवर संभाजीराजे छत्रपती पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटू पाहत होते परंतु त्यांना भेट न देता अभिनेत्री कंगना रणौत आणि प्रियांका चोप्राला कोणत्या प्रश्नांवर भेटले असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट मागितली होती. यासाठी त्यांनी ४ वेळा पत्र पाठवले होते परंतु पंतप्रधान कार्यालयातून राजेंना भेटीची वेळ अद्याप देण्यात आली नाही. यामुळे राजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली होती. खसादर संभाजीराजेंना मोदींनी अद्याप भेट न दिल्याने मराठा समाजामध्ये संताप व्यक्त होत आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संभाजीराजेंना भेट न दिल्याने हा महाराष्ट्राचा अवमान असल्याचे म्हटले आहे. मोदींनी भेट न दिल्याच्या उत्तरवारुन सावंत यांनी चंद्रकांत पाटलांना प्रश्न विचारले आहेत. प्रियांका चोप्रा व कंगनाला वेळ देणाऱ्या मोदींना छत्रपती संभाजी राजेंना भेटायला वेळ नाही. राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते. या अभिनेत्री‌ कोणते प्रश्न घेऊन भेटल्या? कोणास भेटावे हा आक्षेप नाही. संभाजीराजेंना भेट न देणे महाराष्ट्राचा अवमान मात्र आहे. महाराष्ट्रातील बॉलिवूड बद्दल मोदींना अधिक माहिती आहे. पण मराठा आरक्षणाबाबत त्यांना माहिती नाही हे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे मराठा आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून इतिहास रचणाऱ्या आंदोलकांच्या जखमांवर मीठ चोळणारे आहे असे ट्व्टि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button