Top Newsराजकारण

शेतकऱ्यांनी तर वर्षभर आंदोलन केले, पंतप्रधान फक्त १५ मिनिटांत अस्वस्थ? : सिद्धू

चंदीगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर रॅली रद्द झाल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी असल्याची चर्चा आहे. यावरून सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी शेतकरी आंदोलनावरुन नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागले. शेतकरी दिल्लीच्या सीमेवर एका वर्षाहून अधिक काळ आंदोलन केल. त्यांच्याबद्दल कुणी विचारणा केली नाही, पण काल ​​जेव्हा पंतप्रधानांना फक्त १५ मिनिटे थांबावे लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे, हा दुटप्पीपणा का? असा सवाल सिद्धूंनी केला. तसेच, मोदीजी, तुम्ही शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगितले होते, पण त्यांच्याकडे जे होते तेही तुम्ही काढून घेतले, अशी टीकाही केली.

भटिंडा विमानतळावरून पंतप्रधान मोदी रस्त्याने फिरोजपूरला जात असताना शेतकऱ्यांची निदर्शने सुरू होती. त्यामुळे पीएम मोदींचा ताफा १५-२० मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून पडला होता. यानंतर पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परतला. या घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ट्विट करत पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे.

उड्डाणपुलावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे बुधवारी पंतप्रधानांचा ताफा रॅलीच्या ठिकाणी पोहचू शकला नाही. यानंतर पंतप्रधानांनी आपली सभा रद्द करुन भटिंडा विमानतळावर परतले. भटिंडा विमानतळावर परत येताना मोदी तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणाले, ‘भटिंडा विमानतळापर्यंत मी जिवंत परत येऊ शकलो याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांचे आभार.’ यावरून भाजप नेत्यांवर जोरदार टीका होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button