Top Newsमनोरंजन

जॅकलीन फर्नांडीसला मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीचे पुन्हा समन्स

मुंबई : अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसच्या अडचणी पुन्हा वाढताना दिसून येत आहेत. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात जॅकलीनला ईडीने पुन्हा समन्स बजावले आहे. सुकेश चंद्रशेखरमुळे जॅकलीन पुन्हा वादात सापडली आहे. सुकेश चंद्रशेखरवर मनी लाँड्रिंग आणि इतर काही गंभीर आरोप आहेत. रविवारी जॅकलीनला मुंबई विमानतळावरही अडवण्यात आलं होतं. ईडीच्या लुकआऊट नोटीसीनंतरही जॅकलीन भारताबाहेर निघाली होती. त्यावेळी तिला मुंबई विमानतळावर रोखण्यात आलं.

ईडीने जॅकलीनला आज पुन्हा समन्स बजावत ८ डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ठग सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटींच्या मनी लाँड्रिंगचा आरोप आहे. त्यात जॅकलीनचंही नाव समोर आल्यानं जॅकलीनच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. अलिकडेच जॅकलीन आणि सुकेशचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पहायला मिळालं. त्या फोटोतून सुकेश आणि जॅकलीनमध्ये किती जवळीकता होती हे स्पष्ट होत आहे. तर सुकेश अनेकदा जॅकलीनला भेटला होता आणि त्याने जॅकलीनला महागडे गिफ्ट दिल्याचाही आरोप आहे. सुकेशने जॅकलीनला आतापर्यंत तब्बल १० कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याच्या चर्चा आहेत. त्यातल्या ५२ लाखांच्या घोड्याची आणि ९ लाखाच्या मांजरीची जास्त चर्चा होत आहे.

नोरा फतेहीवरही कोट्यवधी खर्च केल्याचा आरोप

सुकेशने फक्त जॅकलीनवरच नाही तर नोरा फतेहीवरही खूप खर्च केल्याच्या चर्चा आहेत. त्यात एका बीएमडब्लू कार आणि आयफोनचा समावेश असल्याचं बोललं जाते. त्यामुळे या दोघींच्या बॉलिवूड करिअरवर परिणाम होऊ शकतो. आता हे प्रकरण जॅकलीनच्या अडचणी किती वाढवणार? हे चौकशीनंतरच कळेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button