राजकारण

ईडीकडून तळोजा जेलमध्ये सचिन वाझेची चौकशी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित १०० कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणाचा तपास ईडीकडून प्रचंड वेगाने सुरु आहे. ईडीने या प्रकरणाचा तपास करत असताना माजी गृहमंत्र्यांच्या घर आणि कार्यालयांवरही छापा टाकला आहे. तसेच देशमुखांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली आहे. त्या दोन्ही सचिवांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यानंतर आता ईडीकडून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझेची चौकशी केली.

ईडीने याआधी अनिल देशमुखांच्या दोन सचिवांची चौकशी केली आहे. तसेच काही बार मालकांची देखील चौकशी केली आहे. काही बारमालकांनी ईडी अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात सचिन वाझेंना पैसे दिल्याचे कबूल केले आहे. तसेच देशमुखांचे दोन्ही सचिव वसूलीच्या रकमेबाबत ठरवायचे, असा युक्तीवाद ईडीची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात केला होता. त्यामुळे याच माहितीच्या आधारावर ईडी अधिकारी सचिन वाझेची चौकशी करत होते. ईडी अधिकाऱ्यांनी सचिन वाझेची जवळपास सलग सहा तास चौकशी केली.

ईडी अधिकाऱ्यांनी सचिन वाझेला परमबीर सिंग यांनी केलेल्या लेटरबॉम्ब विषयी विचारलं. या लेटरबॉम्बमध्ये अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर सचिन वाझेची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी जाणून घेतली. तसेच १०० कोटी वसुलीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारले. तसेच बार मालक आणि इतर साक्षीदार यांनी दिलेल्या जाबाबाविषयी विचारण्यात आलं.

सचिन वाझेची आणखी दोन दिवस चौकशी चालणार आहे. सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. जेल मॅन्युअलप्रमाणे सकाळी आठ ते संध्याकाळी सहा या दरम्यान आरोपीची चौकशी करता येते. त्यानुसार आता त्याची चौकशी संपली आहे. सचिन वाझे याची आणखी दोन दिवस चौकशी चालणार आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सचिन वाझे याची ३ दिवस चौकशी करण्याची परवानगी घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button