राजकारण

माजी मंत्री एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : भोसरी भूखंड प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मुक्ताईनगर येथे जाऊन समन्स बजाविले.

ईडीचे पथक बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास मुक्ताईनगरातील खडसे यांच्या फार्म हाऊसवर धडकले. त्यावेळी तिथे कुणीच नसल्याने बाहेर गेटवर हे समन्स डकविण्यात आले. या प्रकारामुळे जिल्ह्यात अनेक चर्चा आणि अफवा पसरल्या होत्या. ईडीकडून नेमके कोणाला समन्स बजावण्यात आले, पथकाच्या कारवाईची कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

खडसे हे खासगी कामानिमित्त बाहेरगावी आहेत. फार्महाऊस अथवा कोथळी येथील घरावर कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली किंवा लावलेली नाही. एवढेच नव्हे तर जप्तीची कारवाई अथवा इतर कोणत्याही चर्चा या केवळ अफवा आहेत, अशी माहिती ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button