राजकारण

सरकार पाडण्यासाठीच मंत्री आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा : भुजबळ

नागपूर : राज्यभरात सुरु असलेल्या ईडी आणि सीबीआयच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना सरकार पाडण्यासाठीच मंत्री आणि कुटुंबियांच्या पाठीमागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप भाजपवर केला. या कारवायांचा भाजपवर विपरित परिणाम होईल असं म्हणत जनता सब कुछ जानती है, असं छगन भुजबळ म्हणाले. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आमच्यावर सतरा ते अठरावेळा धाडी पडल्या. आत गेलो तेव्हा पण धाडी पडत होत्या. त्यांचा कार्यक्रम चालू आहे असं म्हणत माझं एवढंच म्हणणं आहे जनता सब जानती है, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या सुरु असलेल्या कारवाया या चुकीच्या आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी मंत्र्यांच्या पाठीमागे तपास यंत्रणा लावल्या जात आहेत. मंत्री जर तयार नसतील तर मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मागे यंत्रणांचा ससेमिरा लावायचा. हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे भाजपची प्रतिमा महाराष्ट्रात उंचावेल की कमी होईल याचा त्यांनी विचार करावा, असं छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळ यांनी पुढे बोलताना देशाने असं कधी पाहिलं नाही, याआधी दोन तीन दिवस आयकर विभाग छापा मारायचे. आता छोट्याश्या घरात जाऊन १५-१६ लोक आठवडाभर थांबतात. याचा अर्थ काय? हे भाजपवर उलटणार आहे. सत्तेत येण्यासाठी हे करत आहेत, असं भुजबळ म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button