Top Newsराजकारण

रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नको : चित्र वाघ

मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नियुक्ती होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्याचं नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान भाजपाने चाकणकरांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असं म्हणत निशाणा साधला आहे. रुपाली चाकणकरांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडलं आहे.

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका… अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, असं चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये चाकणकरांचं नाव घेतलेलं नाही. पण चाकणकरांना उद्देशून त्यांनी म्हटल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button