Top Newsराजकारण

पोकळ आश्वासने नकोत, पूरग्रस्तांना तातडीने मदत करा; फडणवीसांचे ठाकरे सरकारला आवाहन

मुंबई: मराठवाड्यात पूरस्थिती ओढवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचं आवाहन सरकारला केलं आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहनच देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

फडणवीस यांनी तीन ट्विट केले आहेत. आज शेतकरी असो की समाजातील लहानातील लहान घटक, त्याला पोकळ शब्द किंवा आश्वासनांची नाही, तर प्रत्यक्ष आणि तीही तातडीच्या मदतीची गरज आहे. राज्य सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा, ही कळकळीची विनंती आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज्यात विशेषत: मराठवाड्यात पावसाने प्रचंड नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने मराठवाड्यातील शेतकर्‍यांना तत्काळ मदत दिली पाहिजे. निसर्ग, तौक्ते ही दोन चक्रीवादळं आणि पुराची कोकणात अजून मदत मिळाली नाही. अशात मराठवाड्यासंदर्भात जी माहिती राज्य सरकारनेच दिली, ती अतिशय धक्कादायक आहे. यंदाच्या पावसाळ्यात ४३६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले, यातूनच या स्थितीची भीषणता लक्षात येते. मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात आहे. कोरोनामुळे सातत्याने लहान घटक संकटात असताना आणि त्यांना कोणतीही मदत स्वतंत्रपणे दिली जात नसताना या आकस्मिक संकटांनी शेतकरी, कष्टकरी, हातावर पोट असणारे घटक खचून जाणार नाहीत, याची काळजी राज्य सरकारने घेतली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button