राजकारण

भाजपच्या १२ निलंबित आमदारांची फडणवीसांसोबत चर्चा

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर सर्व आमदारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत कैफियत मांडली. दरम्यान आता पुन्हा एकदा हे बारा आमदार एकवटले असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी दुपारपर्यंत चर्चा सुरु होती.

भाजपचे निलंबित १२ आमदार आज सकाळी ११ च्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत न्यायालयात जाण्यावर चर्चा केली जाणार असल्याचं कळतंय. १२ आमदारांच्या निलंबनानंतर पुढे कायदेशीर पर्याय काय आहेत? कोर्टात बाजू कितपत टिकून धरेल, केरळ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो, आदी बाबींवर यावेळी चर्चा झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button